नाशिक | Nashik
सिंहस्थात भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात, सुरक्षेसोबतच चांगल्या आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती मिळावी यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. सिंहस्थाची जोरदार तयारी सुरू आहे. हा सोहळा साधू-संतांचा, भाविकांचा, अधिकारी-सेवकवर्गाचा, मुख्य म्हणजे सर्व नागरिकांचा आहे. घरचा सोहळा म्हणून सर्वांनी सिंहस्थात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिधकारी जलज शर्मा (Jalaj Sharma)यांनी केले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) येथे २०२७ मध्ये होणान्या सिंहस्थासाठी राज्य शासन आणि जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. भाविकांसाठी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेची, आरोग्याची व त्यांना चांगले आध्यात्मिक वातावरण व अनुभव मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. दैनिक ‘देशदूत’च्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची’ या संकल्पनेवर जिल्हाधिकारी जलज शर्मा (Jalaj Sharma) यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सिंहस्थात महत्त्वाचे स्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरला विशेष महत्त्व आहे. येथे तीन स्तरावर काम सुरू आहे त्यातील प्रमुख म्हणजे कुशावर्त कुंड! या कुंडात पाणी स्थिर असते. येथे साधू-संत-महंत तसेच भाविक मोठ्या संख्येने स्नान करतात. पर्वणीकाळात स्नानासाठी सतत गर्दी होत असल्याने ‘रिअल टाईम पाणी शुद्धीकरण प्रकल्प सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत उभारला जात आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
गोदावरीचा (Godavari) उगम त्र्यंबकेश्वरजवळ असल्याने नदी बारमाही वाहती ठेवण्याची राज्य शासनाची संकल्पना आहे. बासाठी जलसंपदा विभागामार्फत उपसा प्रकल्प राबवला जात आहे. बेजे भरणातून पाणी उचलून उगमस्थानी सोडले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना वाहत्या पाण्यात स्नान करता येईल. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. पिण्याच्या पाण्यासाठी बेझे धरणातून स्वतंत्र जलवाहिनी टाकली जाणार आहे. घनकच्या व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. भू संपादन पूर्ण झाले आहे. सविस्तर प्रकल्प अहवाल टेंडर प्रक्रियेसाठी प्रलंबित आहे. पावसाळ्यानंतर या कामाला गती मिळेल. शहरातील मलजल बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मलजलवाहिनीचे जाळे. उभारले जात आहे. अंतिम टप्प्यात जोडणीचे काम आणि इलेक्ट्रो-मेकॅनिकल यंत्रणेची उभारणी सुरू आहे. येत्या डिसेंबरपर्यंत प्रकल्प पूर्णक्षमतेने सुरू होईल, असे शर्मा म्हणाले.
सिंहस्थात देशभरातील संत-महंत,आखाड्यांचे प्रमुख आणि अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यांच्यासाठी निवाण्याची सोय हा महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे साधूग्राम उभारले जात आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये ८० एकर जागा साधुप्रामसाठी आरक्षित करण्यात आली आहे, अशी माहिती शर्मा यांनी दिली. नाशिक परिसर वर्षभर धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक व आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पर्यटकांना सेवा-सुविधा व चांगला अनुभव मिळावा हा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या सुविधा केवळ सिंहस्थापुरत्याच मर्यादित न राहता पुढील काळातही उपलब्ध राहतील. त्र्यंबकेश्वर परिसरातील वनविभागाची अनेक आकर्षक स्थळे, पावसाळ्यात गर्दी होणारी ठिकाणे तसेच श्रावणात ब्रह्मगिरी परिक्रमा मार्ग विकसित करण्याचे नियोजन आहे. नाशिकला जागतिक पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पर्यटन विकास कार्यक्रम आखण्यात येत आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
येत्या सिंहस्थात मागील वेळेच्या तुलनेत यावेळी दुप्पट तिपटीने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापनावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. पर्वणीकाळात त्र्यंबकेश्वर व नाशिक येथे सीसीटीव्हीतून २४ तास निगराणी ठेवली जाणार आहे. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. कोणत्या भागात गर्दी वाढली आहे? कुठे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे? याची माहिती तत्काळ मिळेल. सिंहस्थात वाहनांची गर्दी होऊन मोठी वाहतूक कोंडी होण्याचा धोका असतो. म्हणून अंतर्गत आणि ब्राह्य वाहनतळांची व्यवस्था करण्यात येत आहे. भाविकांची वाहने बाह्य वाहनतळांवर उभी राहतील. तेथून बससेवेने भाविकांना अंतर्गत वाहनतळापर्यंत आणले जाईल. त्यानंतर स्नानकुंडापर्यंत पोहोचवले जाईल. दिव्यांगांसाठीही जवळच्या स्नानकुंडापर्यंत पोहोचण्याची सुविधा दिली जाणार आहे. असे शर्मा यांनी नमूद केले.
वाहतुकीसाठी राष्ट्रीय महामार्ग (National Highway) व राज्य महामार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या २,२७० कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. ३,४०० कोटींच्या सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन कामांना प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. याशिवाय ६०० कोटींच्या पूल व रस्त्यांच्या कामांना बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. सिंहस्थात सातत्यपूर्ण वीजपुरवठा होणे महत्त्वाचे आणि आवश्यक ठरणार आहे. गर्दीच्या नियोजनात वीजपुरवठा खंडित होऊ नये, यादृशीने नियोजन केले जात आहे. त्र्यंबकेश्वर व नाशिक या दोन्ही ठिकाणांसाठी स्वतंत्र बीज उपकेंद्र उभारण्याचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी महावितरण कंपनीकडून त्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. लवकरच त्यावर अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. गर्दीचे नियोजन करताना वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणा तसेच श्रद्धाळूची कोणतीही गैरसोय होऊ नये बासाठी बीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे नियोजन केले जात आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
सिंहस्थ हा केवळ प्रशासनाचा वा शासनाचा नाही. हा सोहळा सर्वांचा आहे, साधुसंतांचा, भाविकांचा, प्रशासनातील सेवक, अधिकारी वर्गाचा आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व नागरिकांचा आहे. या सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे. सिंहस्थ महाराष्ट्राच्या मानाचा उत्सव आहे. नाशिकच्या अभिमानाचा आहे. प्रत्येक नाशिककराने हा घरचा सोहळ समजून सिंहस्थात सहभागी होऊन काम करायचे आहे. आम्ही अनेक विभागांची फीडबॅक चॅनल्स उघडलेली आहेत. त्यातून आपण सूचना अणि सल्ले नोंदवायचे आहेत. प्रत्येक सूचनेवर गांभीयनि विचार केला जाईल याचा विश्वास देतो. आपली प्रत्येक सूचना, आपला प्रत्येक विचार हा सिंहस्थ आणखी चांगल्या पद्धतीने करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे जिल्हाधिकारी शर्मा यांनी आवर्जून सांगितले.
मुद्दे
- सिंहस्थासाठी त्र्यंबकेश्वर येथे ‘रिअल टाईम पाणी शुद्धीकरण प्रकल्प’ उभारणी सुरू
- नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे साधूनाम उभारणी सुरू त्र्यंबकेश्वरमध्ये साधूग्रामसाठी ८० एकर जागा आरक्षित
- सिंहस्थात धार्मिक व आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याचे उद्दिष्ट. पर्यटकांना सेवा-सुविधा व चांगला अनुभव मिळावा म्हणून प्रयत्न
- ३,४०० कोटींच्या सांडपाणी व धनकचरा व्यवस्थापन कामांना प्राधिकरणाची मंजुरी.




