Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्यापर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची : शाश्वत विकासाभिमुख सिंहस्थ - विभागीय आयुक्त डॉ....

पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची : शाश्वत विकासाभिमुख सिंहस्थ – विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

नाशिक | Nashik

२०२७ मध्ये होणारा नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) सिंहस्थ देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांना आकर्षित करणारा ठरणार आहे. मागील सिंहस्थाच्या अनुभवातून घेतलेल्या धडधांमुळे यंदाचा सिंहस्थ अधिक व्यापक, सुरक्षित आणि शाश्वत विकासाचा पाया घालणारा ठरेल, असा विश्वास सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम (Dr.Praveen Gedam) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

प्रयागराज (Prayagraj) येथील महाकुंभानंतर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थानिमित्त भाविकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. गर्दीचा उच्चांक प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. गर्दीचे आव्हान पेलण्यासाठी शासन, स्थानिक संस्था, सामाजिक संघटना आणि नागरिक यांचे सहकार्य घेऊन सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला गती या तीन प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात आहे. येता सिंहस्थ अधिक व्यापक, सुरक्षित आणि शाश्वत विकासाचा पाया घालणारा ठोल, असा विश्वास सिंहस्थ प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केला. दैनिक ‘देशदूत’च्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित ‘पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची या संकल्पनेवर बोलताना डॉ. प्रवीण गेडाम यांनी विचार मांडले. गेडाम यानी सिंहस्थासाठी शासन पातळीवर सुरू असलेल्या योजना आणि प्रकल्पाबाबत माहिती दिली.

YouTube video player

प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांची सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची बाब असल्याचे डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले. भाविकांची कोणतीही अडचण अथवा गैरसोय होऊ नये, अपपात टळावेत, लोकांना सिंहस्थात सुखद अनुभव व निखळ आनंद मिळावा, बासाठी सुरक्षा व्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल मॉनिटरिंग सिस्टिम, कंट्रोल रुम्स, आपत्कालीन यंत्रणा आणि प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात केले जातील. सुरक्षा नियोजनात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मार्गदर्शन, पोलिसांचे विशेष पथक, अग्निशमन दल, तसेच एनडीआरएफची मदत घेतली जाणार आहे. सिंहस्थासारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या सोहळ्यात सुरक्षिततेशी तडजोड करता येत नाही. भाविकांचा विश्वास हाच आमचा सर्वात मोठा पुरस्कार आहे, असे डॉ. गेडाम म्हणाले.

सिंहस्था निमित्त उभारल्या जाणाऱ्या सुविधा केवळ तात्पुरत्या न राहता त्या नाशिककरांच्या कायम उपयोगी पडाव्यात, हा प्राधिकरणाचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. रस्ते विस्तार, पूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, रुग्णालये, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रेल्वेस्थानक आणि बसस्थानकांचा विकास या सर्व कामांना गती देण्यात येत आहे. हे प्रकल्प, योजना आणि सुविधा नंतर शहराच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी उपयोगी पडतील. नाशिक जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला यातून मोठी चालना मिळणार आहे. या कामांमुळे शहराचा दर्जा ‘स्मार्ट सिटी च्या पुढील टप्प्यावर नेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे डॉ. गेडाम म्हणाले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर (Nashik-Trimbakeshwar) सिंहस्थ केवळ धार्मिक सोहळा नसून, सांस्कृतिक व पर्यटनाचे एक मोठे व्यासपीठ ठरत आहे. स्थानिक कला, हस्तकला, संगीत, नृत्य यांना व्यासपीठ देण्यासाठी विशेष कार्यक्रम आखले जातील. भाविकांना केवळ धार्मिक सोहळ्याचा अनुभव नन्हे तर त्यांना नाशिकच्या सांस्कृतिक वारशाचीही अनुभूती व्हावी, हे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. सिंहस्थानिमित्त नाशिकला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्याचा प्रयत्न आहे, असे डॉ. गेडाम यांनी सांगितले. सिंहस्थामुळे स्थानिक उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल. हॉटेल, ट्रॅव्हल, परिवहन, किरकोळ विक्री, धार्मिक साहित्य, हस्तकला आदी क्षेत्रांत रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होतील, जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला सिंहस्थाचा दीर्घकालीन फायदा होईल. स्थानिक शेतकरी, द्राक्ष उत्पादक आणि उद्योजक यांनाही मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होईल. हा विकास केवळ सिंहस्थापुरता मर्यादित न राहता पुढील अनेक वर्षे टिकणारा असेल, असे गेडाम म्हणाले.

जगाचे लक्ष वेधून घेणारा हा सोहळा स्वच्छ, सुरक्षित, नियोजनबद्ध व सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करणारा ठरावा, हे प्राधिकरणाचे ध्येय आहे. आमचे सर्व प्रयत्न भाविकांच्या सोयीसाठी आहेत. शासन, प्रशासन व समाज या तिन्हींच्या सहभागातून सिंहस्थ एक आदर्श मेळा ठरेल, बालाचत आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकती हा सोहळा नाशिककरांचा आहे, नागरिकांनी त्यात सक्रिय सहभाग घेतला तर हा सोहळा खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल, असा विश्वास डॉ. गेडाम यांनी व्यक्त केला. २०२६ चा सिंहस्थ केवळ धार्मिक सोहळा न राहता नाशिकच्या (Nashik) विकासाचे नवे पर्व ठरेल. सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्था या तिन्ही पातळ्यांवर तो ऐतिहासिक होईल, असा विश्वास डॉ. प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केला.

मुद्दे

  • नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थानिमित भाविकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे गर्दीचा उमांक प्रस्थापित होण्याची शक्यता आहे.
  • गर्दीचे आव्हान पेलण्यासाठी शासन, स्थानिक संस्था, सामाजिक संघटना आदी नागरिक यांचे सहकार्य घेऊन सुरक्षितता, पायाभूत सुविधा आणि अर्थव्यवस्थेला गती यावर लक्ष केंद्रित.
  • भाविकांना सिंहस्थात सुखद अनुभव आणि निखळ आनंद मिळावा म्हणून सुरक्षा व्यवस्थेला सर्वौच्च प्राधान्य, सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल मॉनिटरिंग सिस्टिम, कंट्रोल रुमा, आपत्कालीन यंत्रणा आणि प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करणार
  • ररते विस्तार, मूल, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, स्पालये, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रेल्वे स्थानफ आणि बसस्थानकांचा विकास या कामांना गती
  • नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ केवळ धार्मिक सोहळा नसून सांस्कृतिक व पर्यटनाचे एक मोठे व्यासपीठ स्थानिक कला, हस्तकला, संगीत, नृत्य यांना व्यासपीठ देण्यासाठी विशेष कार्यक्रम

ताज्या बातम्या

Maharashtra News : प्रदूषण नियंत्रण मंडळाला उच्च न्यायालयाचा झटका; ‘या’ सुविधेवर...

0
मुंबई | प्रतिनिधी | Mumbai महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला (एमपीसीबी) उच्च न्यायालयाने (High Court) झटका दिला . एमपीसीबीला धोकादायक आणि इतर कचरा (व्यवस्थापन...