Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्यापर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची : स्मार्ट सिटीची पायाभरणी! - मंत्री छगन भुजबळ

पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची : स्मार्ट सिटीची पायाभरणी! – मंत्री छगन भुजबळ

नाशिक | Nashik

नाशिकचा प्रवास ‘मंत्रभूमी’ पासून ‘यंत्रभूमी’ पर्यंत झाला आहे. जगाच्या नकाशावर नाशिकला आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त झाले आहे. नाशिकच्या (Nashik) सौंदर्यात भर घालणाऱ्या उड्डाणपुलाबरोबरच पायाभूत सुविधा आणि तीर्थस्थळांची असंख्य विकासकामे झाली आहेत. आगामी सिंहस्थात प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास नाशिक खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’ होईल.

- Advertisement -

गेल्या काळात नाशिक महानगर आणि जिल्ह्यात रस्ते, वाहतूक, पाणी या मूलभूत सुविधा करण्यात आल्या. त्यामुळे शहर व जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणाला चालना मिळाली. नाशिकचा प्रवास ‘मंत्रभूमी’ पासून ‘यंत्रभूमी’ पर्यंत झाला आहे. जगाच्या नकाशावर नाशिकला आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त झाले आहे. नाशिकच्या सौंदयांत भर घालणाऱ्या उड्डाणपुलाबरोबरच पायाभूत सुविधा आणि तीर्थस्थळांची असंख्य विकासकामे झाली आहेत. आगामी सिंहस्थात प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यास नाशिक खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’ होईल, असा विश्वास अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला.

YouTube video player

देशदूत’च्या ५६ व्या (Deshdoot) वर्धापनदिनानिमित्त ‘पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची’ या विषयावर मंत्री छगन भुजबळ यांनी येत्या सिंहस्थाबाबत नाशिक महानगर आणि जिल्ह्याच्या विकासाबाबत मनोगत व्यक्त केले. आगामी सिंहस्थासाठी जिल्हा प्रशासनाकडे आम्ही बरेच प्रस्ताव सादर केले आहेत. नाशिकचा विकास हा त्यामागचा प्रमुख हेतू आहे. सिंहस्थ म्हणजे दर १२ वर्षांनी नाशिकच्या विकासासाठी येणारी नामी संधी आहे. प्रस्तावित विकासकामे पूर्ण झाल्यास देशात सर्वत्र नाशिकचा आदर्श घेतला जाईल, असे भुजबळ म्हणाले.

रस्ते वाहतूक व पायाभूत सुविधा, नाशिक शहरातील उड्डाणपूल, नाशिक विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ गोदे ते पिंपळगाव बसवंत शहरातून जाणाऱ्या सहापदरी मार्गाच्या सेवापधाचे (सर्व्हिस रोड) मजबुतीकरण, मुंबई-नाशिक-धुळे मार्गाचे चौपदरीकरण, नाशिक-येवला मार्ग चौपदरीकरण, त्र्यंबकेश्वर मार्ग चौपदरीकरण (देशातील पहिला हिस्वा चौपदरीकरण मार्ग), नाशिक मनपा हद्दीतील नाशिक छत्रपती संभाजीनगर मागांचे सहापदरीकरण, नाशिक-पुणे मार्ग चौपदरीकरण, नाशिक-शिडी मार्ग आदी कामे तयार करण्यात आली.

नाशिक महानगरासाठी (Nashik City) अंतर्गत व बाह्य रिंगरोड तयार करण्यात येत आहेत. मुंबईहून येणाऱ्या प्रवाशाला त्र्यंबकला जायचे असल्यास तो नाशिकमध्ये न जाता वाडीव-हे-म्हसुलीमार्गे त्र्यंबकला जाऊ शकेल. त्र्यंबकहून समशृंगीगड, सुरत, अहमदाबाद, बडोदा किंवा सापुतारा जाणारे प्रवासी तळवाडे फाटा, देवरगांव, गिरणारे मार्गे जाऊ शकतील, ओझर विमानतळावरून मेरी-म्हसरूळकडे जाणारे प्रवासी मोहाडी-शिवनईमार्गे कमी वेळेत नाशिकला पोहचू शकतील. ओइस विमानतळ आणि मुळ्याकडून सिन्नर, शिर्डी, पुण्याकडे जाणारे प्रवासी पिंपरी सय्यद लाखलगांव-शिदेमार्गे जाऊ शकतात, पुणे, शिर्डी, सिन्नरकडून त्र्यंबकेश्वरला जाणान्या प्रवाशांना भगूर, साकूर, वाडीव न्हे, म्हसुर्लीमार्गे कमी वेळेत त्र्यंबकला जाणे शक्य झाले आहे. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने भाविक आणि पर्यटकांची चांगली सोय झाली.

तीर्थक्षेत्र व इतर पर्यटनस्थळे विकासाबाचतही मंत्री भुजबळ यांनी माहिती दिली. इगतपुरी तालुक्यातील सर्वतीर्थ टाकेद पर्यटन विकासकामे, कावनई येथील कपिलधारा तीर्थ येथील विकास, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर, प्रयाग तीर्थ (अंजनेरी तळे), अंजनेरी येथील साहसी पर्यटक ट्रेकिंग संस्था, ब्रम्हगिरी फेरी मार्ग सुधारणा, सप्तशृंगी देवस्थान वणी-फनिक्युलर ट्रॉली, नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर परिसराचा विकास, चांदवड येथील रेणुकामाता मंदिर, सिन्नर वेधील पुरातन गदिश्वर मंदिर परिसर विकास, मन्हळ खु. येथील खंडेराव मंदिर, गंगापूरचे बोट क्लब, कन्व्हेशन सेंटर, अॅडव्हेन्वर स्पोर्ट्स सेंटर, रिसोर्ट, गोवर्धनचे कलाग्राम, गोदावरी घाट नाशिक व गोदावरी घाट, त्र्यंबकेश्वर ही कामे पूर्ण करण्यात आली, असे भुजबळ यांनी सांगितले.

मंत्री भुजबळ यांनी सिंहस्थ २०२६-२७साठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेल्या विकासकामांची माहिती यावेळी सांगितली. हवाई उड्डाण सोयीचे व्हावे याकरता नाशिक विमानतळ दुसरी धावपट्टी काम पूर्ण करणे, नाशिक विमानतळ टर्मिनल २, नाशिक विमानतळाचे विस्तारीकरण, नाशिक विमानतळ इमिग्रेशन चेक पोस्ट आयसीपी मंजूर करून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्याची सुविधा करणे, नाशिक विमानतळ येथे स्मार्ट व्हिज्युअल डॉकिंग मार्गदर्शन प्रणाली (एसव्हीडीजीएस), प्रोजेक्ट आयएक्स २ अंतर्गत नाशिक महानगरातील सर्व २-जी, ३-जी टॉवर्सचे ४-जी त श्रेणीवर्धन करणे, नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व २, ३ टॉवर्स डिजिटल भारत निधी (पूर्वीचे सॅच्युरेशन प्रकल्प) अंतर्गत ४-जीमध्ये श्रेणीवर्धन करणे, सिंहस्थ २०२७नियोजनाअंतर्गत २०१५ सिंहस्थाप्रमाणे राज्य परिवहन महामंडळ मार्फत ५०० विशेष सिंहस्थ बसेसची ‘अमृत कुंभमेळा’ या संकल्पनेवर निर्मिती करणे, सिंहस्थ नियोजनात राज्य परिवहन महामंडळ नाशिक प्रादेशिक विभागामार्फत प्रस्तावित जादा बसेसच्या प्राथमिक देखभालीसाठी पेठरोड नाशिक येथील विभागीय कार्यशाळेचे (वर्कशॉप) आधुनिकीकरण करणे, त्र्यंबकेश्वर येथे एक्स-बैंड डॉपलर वेदर रडार उभारणे, द्वारका चौकातील प्रस्तावित अंडरपास पूर्ण करून वाहतुकीचे नियमन करणे, ऐन पावसाळ्यात येणाऱ्या सिंहस्थात

अमृतस्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी नाशिक रेल्वेस्टेशनची यार्ड ड्रेनेज योजना तयार करून पाण्यामुळे होणारे आजार टाळणे, सिंहस्थाअंतर्गत नाशिकरोड रेल्वेस्टेशन गुड्स शेड येथे उतरणाऱ्या खत, सिमेंट, पीडीएस मान्य पुरवठ्याचे नियोजन करणे, सिंहस्थ नियोजना अंतर्गत नाशिक ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून घोषित करणे, विभागीय संदर्भसेवा रुग्णालय नाशिकची क्षमता २०० खाटांपर्यंत वाढवणे, ब्रह्मगिरी पर्वतावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाच्या सुरक्षेसाठी वन विभागामार्फत प्रस्तावित सुरक्षा आराखडा मंजूर करणे, राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वाडीवऱ्हे ते समृध्दी महामार्ग भरवीर इंटरचेंज १६.२ कि.मी. नाशिक कनेक्टर पूर्ण करणे, निलगिरी बाग जागेत बांधलेल्या हेलिपॅडचा राज्य शासनाच्या हेलिपॅड धोरणात समावेश करून नाशिक त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडोअरमध्ये हवाई वाहतुकीसाठी प्रस्तावित करणे, त्र्यंबकेश्वर येथील हेलिपॅडचा राज्य शासनाच्या हेलिपॅड घोरणात समावेश करून नाशिक-त्र्यंबकेश्वर रिलिजियस कॉरिडोअरमध्ये हवाई वाहतुकीस प्रस्तावित करणे, सिंहस्थात दूध भेसळ रोखण्यासाठी हमिल्को स्कॅनफ उपकरण मंजूर करणे, नाशिकरोड रेल्वे स्थानक येथे स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प (सॅटीस) मंजूर करणे, नाशिक अग्रिशमन दलाचे श्रेणीवर्धन (नियंत्रण कक्षात एकात्मिक कमांड आणि कंट्रोल सिस्टम स्थापित करणे), नाशिक अप्रिशमन दलातील रिक्त पदे सिहस्वापूर्वी तातडीने भरणे, पीएम ई-बस योजनेअंतर्गत नाशिक मनपाला दुसऱ्या टप्प्यात ५० डबल डेकर ई-बस प्रस्तावित करून नाशिक सिंहस्थ २०२७ मध्ये सार्वजनिक वाहतूक प्रोत्साहित करणे, नाशिक पोलीस आयुक्तालयाची हइवाढ करून पोलीस आयुक्तांचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्रेणीचे पद उन्नत करून अपर पोलीस महासंचालक दर्जाचे पद मंजूर करणे, केंद्र सरकार पुरस्कृत पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत योजनाअंतर्गत नाशिक पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे, सिंहस्थ नियोजनाअंतर्गत नाशिक पोलीस दलासाठी बर्मल ड्रोन मंजूर करणे, मनमाड-नाशिक-इगतपुरी-कसारा ३ रा आणि ४ था रेल्वेमार्ग सिंहस्थापूर्वी कार्यान्वित करणे, नाशिक रेल्वे टर्मिनल, देवळाली पिट लाईन, नाशिक रेल्वेस्थानक एसटीपी क्षमता ४०० केएलडी पर्यंत वाढवणे आदी कामे प्रशासनाकडे प्रस्तावित केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

‘भविष्यातील नाशिक आणि विकसित नाशिक या मुद्यावरही भुजबळ यांनी भूमिका मांडली. नाशिकसाठी व्हिजन ठरवले आहे. त्यात विविध विकासाच्या नव्या प्रकल्प यांचा समावेश आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व संलग्र ४३० खाटांचे रुग्णालय, तसेच महाराष्ट्र पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था इमारत, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, शासकीय यूनानी महाविद्यालय, शासकीय होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय भौतिकोपचार महाविद्यालय, शासकीय दंत व पदव्युत्तर दंत महाविद्यालय होण्याची नितांत आवश्यकता आहे. यासोजतच गोवर्धन कलाग्रामचे अपूर्ण काम पूर्ण करणे, गंगापूर येगा पर्यटन संकुलातील कन्व्हेन्शन सेंटर व साहसी क्रीडा संकुल, पिंत्री सद्रोद्दीन, इगतपुरी येथे आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, किकवी पेयजल प्रकल्प, नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वे, कृषी टर्मिनल मार्केट, पिंत्री सय्यद, ता. जि. नाशिक, दादासाहेब फाळके चित्रसृष्टी, मुंढेगाव, ता. इगतपुरी, इगतपुरी हिल स्टेशन (गिरीस्थान पर्यटनस्थळ), नाशिक मेट्रो, साधुग्राम येथे प्रगती मैदानाच्या धर्तीवर कायमस्वरूपी पायाभूत सुविधा, द्वारका ते नाशिकरोड चौपदरी डबल डेकर उड्डाणपूल, संत निवृत्ती महाराज देवस्थान विकास आराखडा, सप्तशृंगीगड विकास आराखडा, भावली धरण पर्यटन विकास, ओझरखेड धरण पर्यटन विकास, गुमुळ, पायरवाडा, चिमणपाडा, कळमुस्ते, अंबड, कापवाडी, आंबोली वेळूजे आदी प्रवाही वळण योजना, पार गोदावरी एकात्मिक नदीजोड योजना (९.७५ टीएमसी), दमणगंगा-वैतरणा-गोदावरी (कडवा देव) नदीजोड प्रकल्प (७.१३ टीएमसी), दमणगंगा-एकदरे-गोदावरी नदीजोड प्रकल्प (५ टीएमसी), नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्प (१०.७६ टीएमसी), नाशिक-सिन्नर-इगतपुरी डीएमआयसी ( इंडस्ट्रियल कॉरिडॉर), नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दवाढ, महाज्योती नाशिक विभागीय केंद्रासाठी इमारत, मेगा फूडपार्क वडगाव पिंगळा, ता. जि. नाशिक, जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल वाढीव अनुदानातून क्रीडा संकुल काम, सातपूर इएसआयएसचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नाशिक शहरातील जुने गावठाण पुनर्विकास योजना, कायमस्वरूपी औद्योगिक प्रदर्शन केंद्र, कौशल्य विकास विद्यापीठ, शिलापूर येथे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब सुरु करणे, डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे वाढीव ५०० खाटांचे सुसज्ज हॉस्पिटल, आयटी पार्क, लॉजिस्टिक पार्क आणि अॅग्रीकल्चर कन्व्हेन्शन सेंटर, नमामी गोदा (गोदावरी नदी स्वच्छतेसाठी कालबद्ध कार्यक्रम), सुरल-चेन्नई ग्रीनफिल्ड रोड, नाशिक शहराचा मध्य व आह्य रिंगरोडची सुधारणा, एसटीपी आधुनिकीकरण चारशे कोटींचा आराखडा, अमृत-२ मधील वाढीव पाणीपुरवठा योजना ३५० कोटी, फाळके स्मारकाचा पुनर्विकास, औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी प्रकल्प, एअर क्लिनिंग प्रोग्रॅमअंतर्गत इलेक्ट्रिकल बस, गंगापूर धरण ते शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रा दरम्यान पाइपलाइन (२०० कोटी), मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब, दि.१२ ऑगस्ट २०२५ ला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सोलापूर, पुणे, मुंबई हवाई मार्गासाठी उडान योजनेच्या पींवर एक वर्षासाठी प्रतिआसन व्यावहारिक तूट (व्हायबिलिटी गंप फंडिंग व्हीजीएफ) निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली, अशी माहिती भुजबळ यांनी दिली.

केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना विमान प्रवास परवडेल या दृष्टीने उडान (रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम) योजना सुरू केली. सोलापूर विमानतळासाठीही योजना लागू होणार आहेत ही योजना लागू होईपर्यंत वर्षभरासाठी प्रतिआसन ३,२४० रुपये दराने (शंभर टक्के व्हीजीएफ) व्यावहारिकता तूट म्हणून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे सोलापूर, पुणे, मुंबई हवाई प्रवास दर कमी होण्यास मदत होणार आहे. उडान योजनेअंतर्गत ‘रिजनल कनेक्टिव्हिटी स्किम हा निर्णय नाशिकसाठी लागू करण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

मुद्दे

  • आगामी सिंहस्थासाठी जिल्हा प्रशासनाकडे बरेच प्रस्ताव सादर त्यामागे नाशिकचा विकास हाच प्रमुख हेतू,
  • सिंहस्थ म्हणजे दर १२ वर्षांनी नाशिकच्या विकासासाठी येणारी नानी संधी.
  • आगामी सिंहस्थात प्रस्तावित काने पूर्ण झाल्यास नाशिक खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटी’ होईल.
  • नाशिक महानगरासाठी अंतर्गत व बड़ा रिंगरोड तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास तुलम,
  • नाशिकसाठी ‘व्हिजन’ ठरवले आहे. त्यात विविध विकासाच्या नव्या प्रकल्प यांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

“दैवतं पळवण्याचा निर्लज्जपणा, गुजरातमध्ये सगळे बकासूर…”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून संजय...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीबाबत केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड...