नाशिक | Nashik
केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा सिंहस्थ ऐतिहासिक ठरावा यासाठी शासन, स्थानिक संस्था, सामाजिक संघटना व नागरिकांचे सहकार्य घेतले जात आहे. सिंहस्थासाठी हजारो कोटींची विकासकामे सुरू झाली आहेत. सिंहस्थापूर्वी नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) तीर्थक्षेत्रांचा कायापालट झालेला दिसून येईल.
प्रयागराजचा महाकुंभाच्या पतीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरचा (Nashik-Trimbakeshwar) आगामी सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी सूक्ष्म नियोजनातून विविध उपाययोजनांवर राज्य सरकारने लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थ एक जागतिक सोहळा ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी व्यक्त केला.
दैनिक ‘देशदूत’ च्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची’ या संकल्पनेवर आधारीत विशेषांकास शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विशेष मुलाखत दिली. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणारा सिंहस्थ ऐतिहासिक ठरावा यासाठी शासन, स्थानिक संस्था, सामाजिक संघटना व नागरिकांचे सहकार्य घेतले जात आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून नियोजन व व्यवस्थापन केले जात आहे, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
प्रयागराज (Prayagraj) येथे अलीकडेच यशस्वी झालेल्या बहुचर्चित महाकुंभामुळे बेत्या २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थाबाबत देश-विदेशातील भाविकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी गेल्या सहा महिन्यापासून व्यक्तीशः लक्ष घालून सिंहस्थ नियोजन-तयारीचा आहावा घेण्यास सुरुवात केली आहे. नियोजन व प्रभावी व्यवस्थापनासाठी कुंभमेळा मंत्रिपदी गिरीश महाजन यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापनाही करण्यात आली आहे. सिंहस्थासाठी राज्य शासनाने हजारो कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार विविध विकासकामे सुरू झाली आहेत. ही विकासकामे मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे सिंहस्थापूर्वी नाशिक-त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा कायापालट झालेला दिसून येईल, असे भुसे यांनी सांगितले.
प्रयागराज येथे काही महिन्यांपूर्वी महाकुंभमेळा (Mahakumbh) सव्वाशे कोटीवर भाविकांची उपस्थिती असतानाही योग्य नियोजन व व्यवस्थापनातून तो यशस्वी करण्यात आला. राज्य सरकारने विविध विभागांच्या वरिष्ठ अधिकान्यांचे पथक प्रयागराज येथे पाठवून तेथील कुंभमेळा नियोजनासाठी झालेल्या असलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली होती. सरकारने नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या प्राधिकरणाची रचना प्रयागराज कुंभमेळा धर्तीवर करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळा व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासह प्रस्तावित बांधकामांना प्रशासकीय मान्यता देणे, निविदा प्रक्रिया राबवत कंत्राटदार नियुक्त करणे, त्यांच्या दायित्वांचे सनियंत्रण आदी कार्य प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाला अधिकार देण्यात आले आहेत. प्राधिकरणामुळे विभागांचा समन्वय गतिमान होण्यासह विकासकामांना गती मिळणार आहे. राज्य सरकारने सिंहस्थासाठी ३ हजार ५६ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजूरी दिली आहे. तीन टप्प्यात हा निधी खर्च करण्याचे नियोजन आहे. मार्च २०२६ पर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. निधी न वापरल्यास जबाबदारी निश्चित करण्यात आल्याने निर्धारीत वेळेत ही कामे पूर्ण होतील, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
नाशिकला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांचा विस्तार, पाणीपुरवठा, मलनिस्सारण व्यवस्था, रुग्णालय, सार्वजनिक स्वच्छतागृहे, रेल्वे स्थानके व बसस्थानकांचा विकास वा सर्व कामांना गती देण्यात आली आहे. नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये ही विकासकामे होत आहेत. प्रयागराज येथे गंगानदीचे विस्तीर्ण पात्र आहे. तशी परिस्थिती नाशिक व त्र्यंबकेश्वरला नाही. रामकुंड व कुशावर्त तीर्थातच स्नान करण्याची भाविकांची अपेक्षा असते. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते. हे लक्षात घेऊन या दोन्ही ठिकाणी अनेक कुंडे पुर्नजीवित केली जाणार आहेत. तसेच, घाटांचा विस्तार करून गर्दीचे नियोजन केले जाणार आहे. सिंहस्थच नव्हे तर देश-विदेशातील भाविक गोदावरी नदीवर स्नानासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वरला येतात. अनेकदा नदी प्रवाहीत नसल्याने भाविकांचा हिरमोड होतो. असे होऊ नये म्हणून गोदावरी प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
त्र्यंबकेश्वरपासून गोदावरी नदीत पाणी सतत वाहते ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून नियोजन केले जाणार आहे. सिंहस्थात भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेला राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यासाठी पोलीस, आपत्कालीन यंत्रणा, प्रशिक्षित स्वयंसेवक, पोलिसांचे विशेष पथक, अग्निशमन दल आदींची मदत घेतली जाणार आहे. ‘एआय’ तंत्रज्ञानाचा (कृत्रिम बुध्दिमत्ता) वापरही पोलीस यंत्रणेकडून केला जाणार आहे. नाशिकरोडसह देवळाली, कसबे सुकेणे, ओडा, खेरवाडी या पाच रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाकडून या स्थानकांवर १ हजार ११ कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविकांना सुरक्षित व सुखदायी प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
सिंहस्थात राज्याच्या उद्योग विभागाकडून उद्योजकांसाठी ‘रेन्ट सिटी’ उभारली जाणार आहे, साहित्यिकांसाठी तंबू निवास उभारले जातील. सिंहस्थ हा सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने मोठे व्यासपीठ ठरणार आहे, त्यामुळे स्थानिक कला, हस्तकला, संगीत, नृत्य यांनाही व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन केले जाणार आहे. स्थानिक उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्राला सिंहस्थातून मोठी चालना मिळणार आहे. हॉटेल्स, ट्रॅव्हल्स, ल्स्, परिवहन, चार्मिक साहित्य विक्री आदी क्षेत्रातही रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे. स्थानिक शेतकरी व उद्योजकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. त्यातुन जिल्ह्याच्या अर्थकारणाला खन्या अर्थाने चालना मिळू शकणार आहे. सिंहस्थासाठी उभारली जाणारी प्रत्येक सुविधा नाशिक, त्र्यंबकेश्वर शहराच्या प्रगतीसाठी निश्चित उपयोगी पडेल, असे भुसे यांनी सांगितले.
सिंहस्थानिमित्त होणारी विकासकामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण व्हावीत, याकरता संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राबरोबरच जिल्ह्यातील सप्तश्रृंगीगड, कावनई, श्रीक्षेत्र बंदनपुरी आदी तीर्थक्षेत्रांचादेखील विकासात समावेश केला जाणार आहे. सिंहस्थातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू नये व विकासकामे निर्धारित वेळेतच पूर्ण व्हावीत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे बारकाईने लक्ष आहे, असे दादा भुसे म्हणाले.
मुद्दे
- सिंहस्थापूर्वी विकासकामे पूर्ण झाल्यावर नाशिक-त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांचा कायापालट झालेला दिसून येईल.
- रामकुंड व कुशावर्त तीर्यालय स्नान करण्याची भाविकांची अपेक्षा असते. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होते. म्हणून या दोन्ही ठिकाणी अनेक कुंडे पुर्नजीवित केली जातील.
- नदी प्रवाहित नसल्याने भाविकांचा हिरमोड होतो म्हणून गोदावरी प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न असेल. त्र्यंबकेश्वरपासून गोदावरीत पाणी वाहते ठेवण्यासाठी राज्य सरकारचे नियोजन.
- सिंहस्थात राज्याच्या उद्योग विभागाकडून उद्योजकांसाठी ‘टेन्ट सिटी’ उभारली जाणार साहित्यिकांसाठी तंबू निवारा उभारणार.
- सांस्कृतिक व पर्यटनाच्या दृष्टीने सिंहस्थ मोठे व्यासपीठ ठरणार स्थानिक कला, हस्तकला, संगीत, नृत्य यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विशेष कार्यक्रमांचे नियोजन.




