Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची : 'न भुतो न भविष्यती' असा सिंहस्थ -...

पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची : ‘न भुतो न भविष्यती’ असा सिंहस्थ – मंत्री गिरीश महाजन

नाशिक | Nashik

गेल्या सिंहस्थात जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सिंहस्थाची जबाबदारी हाताळली. तो अनुभव आताच्या सिंहस्थात उपयोगी पडेल. प्रयागराजप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थही यशस्वीपणे पार पडेल. येता सिंहस्थ ‘न भुतो न भविष्यती’ असा असेल, असा विश्वास जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

‘मंत्रभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक तसेच त्र्यंबकेश्वरला (Nashik-Trimbakeshwar) २०२७ मध्ये सिंहस्थ होणार आहे. या सोहळ्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी माझ्यावर सोपवली आहे. त्यांचा विश्वास सार्थ ठरवताना प्रयागराजच्या महाकुंभाप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वरचा सिंहस्थही यशस्वी केला जाईल, यावेळचा सिंहस्थ ‘न भूतो न भविष्यती’ असा असेल, असा विश्वास जलसंपदा, आपत्ती व्यवस्थापन व कुभमेळामंत्री (Kumbhmela Minister) गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

YouTube video player

दैनिक ‘देशदूत’च्या ५६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘पर्वणी सिंहस्थाची, आस विकासाची’ या संकल्पनेवर गिरीश महाजन यांनी ‘देशदूत’शी संवाद साधला. सिंहस्थात कोट्यवधी भाविक उपस्थित राहण्याचा अंदाज आहे. त्यादृष्टीने नाशिकच्या (Nashik) चहूबाजूचे मार्ग सहापदरी करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जाईल, गेल्या सिंहस्थात नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी माझ्याकडे होती. त्या सिंहस्थाचा अनुभव यावेळी उपयोगी येईल, असे महाजन यांनी सांगितले.

तपोवन परिसरात साधु‌ग्रामची उभारणी करण्यात येणार आहे. ३१८ एकर जागा त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे. हा परिसर ‘ना-विकास क्षेत्र असल्याने यातील ५४ एकर जागा महापालिकेने कायमस्वरुपी संपादित केली आहे. उर्वरित २६४ एकर जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहीत केली जाणार आहे. ही जमीन केवळ सिंहस्थात एक वर्षासाठी भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना त्याचा योग्य तो मोबदला दिला जाईल. अगामी सिंहस्थात (Simhastha Kumbh Mela) वैष्णवपंथीय तीन आखाडे आणि १,१०० खालसा असे सुमारे चार लाख साधू-महंत वास्तव्यास राहण्याचा अंदाज आहे. त्यांच्या सोयी-सुविधांकडे प्रशासनाकडून विशेष लक्ष पुरवले जाईल. स्वयंसेवकांचीही मदत घेतली जाईल, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

नाशिक सिंहस्थ आराखडा समन्वय समितीने ११,११७ कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार केला होता. सिंहस्थासाठी भूसंपादनालाच पाच हजार कोटींचा खर्च लागेल. त्यासाठी शासनाने विशेष तरतूद केली असून हा खर्च २० हजार कोटींवर जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून आणखी निधी मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मंत्री महाजन म्हणाले. प्रयागराजमधील सिंहस्थात दररोज लाखो भाविक अमृतस्नान करून बाहेर येत होते. तरीही गंगेचे पाणी शुद्ध राहत होते. त्याच पद्धतीने गोदावरी जलप्रवाह निर्मळ आणि कायम प्रवाही राहावा यासाठी प्रयागराजच्या मतीवर प्रयत्न केले जातील. तशाच यंत्रणा पंचवटी व त्र्यंचकेश्वर येथे उभारून गोदावरीचे पावित्र्य अबाधित राखले जाईल. शहरातील सांडपाणी नदीपात्रात जाऊ नये यासाठी मनपाला आतापासून नियोजन करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

नदी प्रवाहित राहिल्यास शुद्ध राहील. त्यासाठी आवश्यक कायम प्रवाही राहावा यासाठी प्रयागराजच्या मतीवर प्रयत्न केले जातील. तशाच यंत्रणा पंचवटी व त्र्यंचकेश्वर येथे उभारून गोदावरीचे पावित्र्य अबाधित राखले जाईल. शहरातील सांडपाणी नदीपात्रात जाऊ नये यासाठी मनपाला आतापासून नियोजन करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. नदी प्रवाहित राहिल्यास शुद्ध राहील. त्यासाठी आवश्यक नियोजन सुरू आहे. साधू-महंतांच्या सूचना लक्षात घेऊन सरकारकडून आवश्यक ते नियोजन करण्यात येईल. सिंहस्थ हा आपला मानबिंदू आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी सहकार्य करतील, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

प्रयागराजमधील महाकुंभावेळी योग्य नियोजन झाल्याने देशातच नव्हे, तर जगात तेथील महाकुंभाला लौकिक प्राप्त झाला. काही घटना वगळता तेथे कोणतीही अडचण आली तरी प्रशासन, शासन व स्थानिक नागरिका च्या सहकायनि तोडगा काढण्यात आला. त्यानुसार नाशिकच्या सिंहस्थाचे नियोजन करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्य सचिव, नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक या सर्व अधिकाऱ्यांसोबत सतत संपर्क सुरू आहे, असे महाजन म्हणाले.

नाशिकच्या पंचवटी परिसरात साधू संतांसाठी तात्पुरत्या स्वरापात राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. प्रमुख आखाडे व त्यांच्यासोबत वेणाऱ्या जवळपास पाच लाख साधूची राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक पर्वणीला ८० लाख भाविक येण्याची शक्यता गृहीत धरून तीन पर्वणी व इतर महत्त्वाचे दिवस मिळून पाच ते सात कोटी भाविक नाशिकला येतील, असा अंदाज आहे. त्यानुसार पोलीस विभाग, महसूल विभाग, सामाजिक संस्था यांची मदत घेऊन नियोजन केले जात आहे, असे महाजन यांनी सांगितले.

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थासाठी येणाऱ्या भाविकांची संभाव्य मोठी संख्या, वाढत्या गरजा आणि व्यवस्थापनाचे नियोजन यादृष्टीने सिंहस्थ क्षेत्रात सुविधांचे नकाशे तयार करण्यात येणार आहेत. सिंहस्थात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पाच हजार सीसीटीव्हींची नजर राहणार आहे, अशी माहिती महाजन यांनी दिली, पंचवटी परिसरातील सीतागुंफा, काळाराम मंदिर, रामकुंड परिसराला पंचवटीचे स्वरूप देण्यात येणार आहे. सर्व रस्ते व घरांच्या प्रथमदर्शनी भागांचे नूतनीकरण करण्यात येईल. अमृतस्नान होणाऱ्या रामकुंड आणि लक्ष्मी कुंडाच्या मध्यभागी सतत जलप्रवाही भव्य गोमुख तयार करण्यात येणार आहे. काळाराम मंदिरासमोरील जागेत प्रभू श्रीरामांच्या जीवनावर आधारित देखावे उभारण्यात येत आहेत. रामकुंडात श्रीरामांचे बाण मारतानाचे शिल्प, गांधी तलावावर लेझर शो, रामकुड पाणी स्वच्छतेसाठी फिल्टर आदी गोष्टींकडे चारकाईने लक्ष आहे. गेल्या सिंहस्थात्तील त्रुटी दूर करण्याचा पुरपूर प्रयत्न केला जाईल, असे गिरीश महाजन यानी सांगितले.

मुद्दे

  • प्रयागराज महाकुंभाप्रमाणे नाशिक-त्र्यंबकेश्वरवा सिंहस्थ यशस्वी करणार
  • नाशिकच्या चहुबाजूंचे मार्ग सहापदरी करणार, त्यासाठी निधी उपलब्ध
  • सिंहस्थ काळात वाहतूककोंडी होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाणार
  • तपोवन परिसरात ४०० एकर क्षेत्रावर साधुग्रामची उभारणी करण्यात येणार
  • गोदावरी जलप्रवाह निर्मळ आणि कायम प्रवाही राहावा म्हणून ‘प्रयागराज’च्या धर्तीवर प्रयत्न

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...