नाशिक | देशदूत चमू | Nashik
त्र्यंबकेश्वरचा (Trimbakeshwar) कुंभमेळा (Kumbh Mela) हा मुख्य कुंभमेळा असून गोदावरीच्या (Godavari) उगमस्थानावरील पर्वणी खऱ्या अर्थाने पर्वणी म्हणून ओळखली गेली पाहिजे, त्र्यंबकेश्वरात नऊ तर नाशिकला तीन आखाड्यांचे शाहीस्नान होत असते. त्यामुळे कुंभमेळ्याचा उल्लेख होताना आधी त्र्यंबकेश्वर नंतर नाशिकचा (Nashik) उल्लेख होणे अपेक्षित आहे. असे मत विविध आखाड्यांच्या ठाणापतींनी दै, ‘देशदूत’शी बोलताना व्यक्त केले.
प्रत्यक्षात प्रयागराज येथे कुंभस्नानाला गेलेल्या त्र्यंबकेश्वरच्या नऊ आखाड्यांचे संत-महंत होळीनंतर (Holi) नाशकात दाखल होणार आहेत. तेव्हा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी संत महंतांची समिती नियुक्त केली जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रशासनाबरोबर बैठका सुरू होतील. आतापर्यंत फक्त अधिकारी वर्गासोबत नियोजनाच्या बैठका सुरू आहेत. विविध आखाड्याच्या ठाणापतींशी साधलेल्या संवादानुसार, मठात असलेल्या जागा या संत-महत, शिष्यगणांसाठी पुरेशा ठरणार नाहीत, या ठिकाणी त्यांची अतिरिक्त व्यवस्था करणे गरजेचे आहे, मागील सिंहस्थाच्या तुलनेत या सिंहस्थाला मोठ्या प्रमाणात गर्दी वाढणार आहे. त्यात साधू-संतांची उपस्थितीदेखील वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जादा जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त (Simhastha Kumbh Mela) येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या माध्यमातून कायमस्वरुपी विकासकामांसाठी खर्च होणे अपेक्षित आहे. जसे कायमस्वरुपी भक्त विग्राम कक्ष उभारल्यास त्र्यंबकेश्वरमध्ये दरवर्षी भरणाऱ्या १६ विविध महाउत्सवांनिमित्त येणाऱ्या भाविकांची (Devotees) सोय होणार आहे. त्या माध्यमातून येणाऱ्या श्रद्धाळूना त्याचा वापर करता येईल. सिंहस्थ पर्वणी या बहुतांश पावसाळ्यातच येतात. त्यामुळे भाविकांच्या सोबीसाठी त्या ठिकाणी पावसाच्या दृष्टीने शेड, शौचालय, स्नानगृष्ह यांची कायमस्वरुपी व्यवस्था केल्यास दरवर्षी त्यासाठी खर्च करण्याची गरज पडणार नाही व शहाची स्वच्छता व पावित्र्य अबाधीत राहील, असे मत व्यक्त केले.
शासकीय जागांचा शोध गरजेचा
त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक विकाणी जागा पडित असून अनेक जागांवर अतिक्रमण झाले आहे. त्या जागा ताब्यात घेऊन कायमस्वरुपी सुविधा उपलब्ध केल्यास येणाऱ्या भाविकांची सोयही होईल आणि जागांचा सदुपयोगही होईल. पर्वणीकाळात गर्दीच्या वेळी भाविकांना टप्प्याटप्याने स्नानासाठी सोडणे त्यामुळे शक्य होणार आहे. गर्दीच्या वेळात व शाहीस्नानाच्या काळात दूरवरून आलेल्या श्रद्धाळूना विश्राम करण्यासाठीदेखील जागा उपलब्ध होईल.
पुरातन मंदिरांचे ‘धार्मिक सर्किट’ हवे
त्र्यंबकेश्वरच्या पेगलवाडीत प्रथामतीर्थ येथे अहिल्याबाई होळकरांच्या पुढाकाराने पेशव्यांनी बांधलेला घाट आजही सक्षमपणे उभा आहे. या घाटाच्या मागील भागात गोदावरी प्रवाहित राहते. तिथे घाट बांधल्यास काही अंशाने भाविक त्या गोदावरी पात्रात स्नान करून पवित्र सिंहस्थ पर्वणीचा लाभ घेऊ शकतील. सिंहस्थ कुंभमेळा हा वर्ष-दीड वांचा उत्सव असतो. मात्र खऱ्या अर्थाने त्र्यंबकेश्वर परिसरामध्ये असंख्य धार्मिक स्थळांची स्थापना अनादी काळापासून आहे. त्यांचा विकास करून त्या पर्यटनस्थळांना ‘धार्मिक सर्किट’ निर्माण करणे गरजेचे आहे. त्यात प्रामुख्याने ब्रह्मगिरी फेरी, गहिनीनाथ महाराज मंदिर, गौतम ऋषी आश्रम, अहिल्यादेवी मंदिर, निवृत्तिनाथ महाराज संजीवन समाधी, महाज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर, हनुमान जन्मस्थान अंजनेरी गड, नीलपर्वत टेकडी मंदिर, अन्नपूर्णदेिवी मंदिर यांसारख्या स्थळांचा विकास करून भाविकांना त्या ठिकाणची माहिती उपलब्ध करून दिली तर निश्चितपणे वर्षभर त्र्यंबकेश्वरमध्ये येणारे भाविक त्या पवित्र स्थानांचे दर्शन घेतील.
आवागमनाचे मार्ग तयार करणे
पर्वणीकाळात स्नानासाठी येणाऱ्या भाविकांचा आणि स्नानानंतर भाविकांचा परतीचा मार्ग तयार करण्याची गरज आहे. प्रत्यक्षात त्र्यंबकेश्वर कुशावर्ताची जागा छोटी आहे. त्या ठिकाणच्या आवागमनाचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे मत ठाणापतींनी व्यक्त केले. त्यादृष्टीनेही कायमस्वरुपी नियोजन केल्यास दरवर्षी येणाऱ्या उत्सवांना तसेच दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये भाविकांची सोय होईल, असाही सूर ठाणापर्तीच्या चर्चेतून पुढे आला.
धरणातून पाणी उचला
सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल होणारे संत, महंत, सेवेकरी तसेच येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी पाण्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पर्वणी काळात गोदावरी प्रवाहित राहण्यासाठी लगतच्या किकवी, तळेगाव काचुर्ती धरणातून पाणी लिफ्ट करून ते पाणी गंगासागर तलावात सोडून नदीपात्र प्रवाहित ठेवता येणार आहे. त्याबाबतचे नियोजन करणे गरजेचे आहे. ही प्रक्रिया सतत राबवणेही तितकेच गरजेचे ठरणार आहे. वीजपुरवठा अखंडित राहण्याच्या दृष्टीने तातडीचे नियोजन करणेही गरजेचे असल्याचे ताणापतींनी चर्चेत सांगितले. अंतर्गत रस्त्यांची व प्रसाधनगृहांची व्यवस्था तातडीने होणे गरजेचे आहे. अंतर्गत रस्ते खराब झाले असून दुरुस्ती कामांना गती देण्याची गरज आहे.
बोल महंतांचे…
साधुग्राम परिसरामध्ये घाट निर्माण करावा, प्रयागप्रमाणेच फिल्टरेशन प्लांट बसवावे, सुनियोजित बेरिकेडिंग करावी, अहिल्या गौतमी ऋर्षीचे स्थान दुर्लक्षित आहे, त्याचा विकास करावा. मान्यता, परंपरा यासाठी आवाज उठवणे गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये विविध पूजाविधी केले जातात. त्यासाठी स्वतंत्र जागा द्यावी. त्यामुळे मंदिर परिसरातील गर्दी आपोआप कमी होईल.
महंत अजयपुरीजी, ठाणापती, महानिर्वाणी आखाड़ा
त्र्यंबकेश्वर देवस्थान हे पवित्र मानले जाते. या गाव परिसरात दारू, मांस, मच्छीची दुकाने असू नयेत, स्थानाचे पावित्र्य जपण्यासाठी यांना गावाच्या बाहेर ठेवावे, भाविकांच्या भावनेचा व आरोग्याचा विचार करणे गरजेचे आहे. नदी स्वच्छ ठेवली तर आपले पितृ संतुष्ट होतील.
महंत गोपालदासजी महाराज, ठाणापती, पंचायती नया उदासीन आखाडा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग आला असला तरी २०२६ मध्ये संत, महंत व भाविकांच्या आगमनाला प्रारंभहोणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कामाची गती वेगाने वाढणे गरजेचे आहे. आखाड्याचे महंत लवकरच दाखल होतील आणि त्यापाठोपाठ या कानांचा आढावाही घेतला जाईल, वेळ कमी असल्याने प्रशासनाने विकासकामांना गती देणे गरजेचे आहे.
महंत महेंद्र दानोनी, ठाणापती, बडा उदासीन आखाडा