Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSimhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा दिमाखदार व्हावा

Simhastha Kumbh Mela 2027 : सिंहस्थ कुंभमेळा दिमाखदार व्हावा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

२०२७ मध्ये होणान्या सिंहस्थ कुभमेळ्याची (Simhastha Kumbh Mela 2027) प्रशासकीय स्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. दर आठवड्याला विविध कामांचा आढावा घेण्यात येत आहे. अनेक कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या सर्व विकासकामांचा व आढावा बैठकांचे वार्तांकन ‘देशदूत’ करत आहे. हे वार्तांकन करताना ‘देशदूत’ला अनेक मुद्दे लक्षात आले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नाशिक दौऱ्यावर (Nashik Visit) येत आहेत. ते सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा घेणार असून त्यानिमित्त पुढील मुद्दे ‘देशदूत’ मांडत आहे.

- Advertisement -

एआय तंत्रज्ञानाचा वापर

नाशिकच्या सिंहस्थात एआय टेक्नॉलॉजीचा (AI Technology) यंदा जास्त वापर करण्यात येणार आहे. प्रयागराजला एआय टेक्नॉलॉजीचा कॅमेरा तयार करण्यात आला असून त्यात विविध भाषांचा वापर करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने नाशिकमध्ये (Nashik) येणाऱ्या भाविकांसाठी सोय असावी.

प्राधिकरणाची स्थापना कधी?

मुख्यमंत्र्यांनी मुंबईत (Mumbai) झालेल्या बैठकीत सिंहस्थासाठी प्राधिकरण करण्याची घोषणा केली. मात्र अद्याप प्राधिकरणाची निर्मिती दिसत नाही. यामुळे सिंहस्थाचे काम कोण करणार व ती कामे दर्जेदार आणि वेळेत होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

नियो मेट्रोची प्रतीक्षा

सुमारे २५ लाखांच्या घरात नाशिकची लोकसंख्या पोहोचली असून सततच्या वाहतूककोंडीमुळे शहरवासीय त्रस्त झाले आहेत. त्यामुळे नाशिकला घोषणेप्रमाणे लवकरात लवकर नियो मेट्रो सुविधा मिळावी.

रस्त्यांचे मजबुतीकरण

रस्त्यांचे बळकटीकरण आवश्यक आहे. भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वरमध्ये विनाअडथळा कसे पोहोचतील, स्थानिक नाशिककरांची गैरसोय कशी टाळता येईल, याकडे यंत्रणेने नियोजन करणे आवश्यक आहे.

त्र्यंबकेश्वर

कचरा डेपो : जास्त जागा उपलब्ध करून त्या जागेवर कचरा डेपो स्थलांतरित करणे आवश्यक आहे.

मलजल शुद्धीकरण केंद्र : मलजल प्रक्रियेचा नवा प्रकल्प गावाबाहेरच्या कचरा डेपोलगत स्थलांतरित करून त्याचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. नाल्यांमधून येणारे दूषित पाणी या मलजल वाहिन्यांमध्ये बंदिस्त करून प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेणे गरजेचे आहे.

कुशावर्त पाणी स्वच्छता : कुशावर्त परिसरात स्नानासाठी हजारो भाविक येत असतात. त्यांच्या माध्यमातून कुशावर्तच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी जलशुद्धीकरण प्रक्रिया सक्षम करणे गरजेचे आहे.

मद्य व मांसविक्री : भरवस्तीत मंदिराजवळील मद्य व मांसविक्री व्यवसाय स्थलांतरित करण्याची गरज.

भाविक ग्राम उभारणे : लाखो भाविकांना विश्रामासाठी भाविक ग्राम उभारण्याची संकल्पना.

वाहनतळ : पेगलवाडी परिसरात तात्पुरती मोठी जागा अधिग्रहीत करून वाहनतळ उभारावे, तेथून शहर बससेवा उपलब्ध करावी.

धार्मिक सर्किट : त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीसह विविध ३२ देवस्थानांची माहिती व त्यांचे मार्ग तयार करून ते भाविकांना उपलब्ध व्हावे.

वाहनतळे : आजमितीस सिंहस्थासाठी आवश्यक पूल, रस्ते, मार्गिका, वाहनतळे, गर्दीचे व्यवस्थापनाबाबतचे प्रत्यक्ष बांधकामे सुरु झालेली नाहीत. ही कामे आताच सुरु झाली तर ऐनवेळी उडणारी धावपळ.

गर्दीचे नियोजन : गर्दी नियंत्रणासाठी एआयचा वापर होणार आहे. त्या माध्यमातून अनेक दुर्घटना टळण्यास मदत होईल. तसेच, नाशिकच्या सर्वच यंत्रणांच्या प्रमुखांनी प्रयागराजचा अभ्यास दौरा केल्याने त्याचा नाशिक कुंभसाठी उपयोग होईल.

ही कामे महत्वाची

■ सिंहस्थ कुंभमेळा अद्याप कागदावरच दिसत असून, प्रत्यक्षात कामाची सुरुवात होणे गरजेचे आहे.
■ नाशिक महापालिकेने पंधरा हजार कोटींचा आराखडा तयार करुन शासनाकडे दिला आहे. त्यात बाह्य व अंतर्गत रिंगरोड करायचा आहे.
■ साधुग्राम परिसरात पायाभूत सुविधा, मलनिस्सारण केंद्र नूतनीकरण, पार्किंग, गोदा घाट विकास करण्याचे काम करणे अपेक्षित आहे.
■ साफसफाई व स्वच्छता, पाणीपुखठा, आरोग्य, विद्युत विभागांची कामे अद्याप मार्गी लागलेली नाही.
■ रामकुंड व गोदावरीतील क्रॉकिटीकरण काढून नदी जिवंत करणे.
■ रामकुंड येथे स्नानासाठी योग्य दर्जाचे पाणी मिळावे, यासाठी पाणी वाहते ठेवणे अथवा जलशुद्धीकरण यंत्रणा बसवणे.
■ गोदावरी परिसर अधिक स्वच्छ करणे.
■ रामकुंड परिसरातील अतिक्रमणे दूर करणे.
■ पुलांचे मजबुतीकरण.
■ रामसेतू पूल मजबूत करणे.
■ नारोशंकर मंदिर परिसर आणि राम-काल पथ मार्गातील अतिक्रमण हटवणे.
■ काळाराम मंदिर आणि सीता गुंफा परिसराचा विकास, तसेच आरक्षित भूखंडांचे संपादन.
■ गोदावरी-नंदिनी संगम, नांदूर आणि दसक येथे घाटांचा विकास.
■ कपिला संगम येथे लक्ष्मण झुला पूल उभारणी.

नाशिकरोड

  • देशभरातून येणारे भाविक रेल्वेस्थानकावर उतरतील. त्यामुळे मोठी गर्दी होण्याची शक्यता.
  • रेल्वेस्थानकाबाहेरील अतिक्रमण हटवणे गरजेचे.
  • गोदावरी नदीवर दसक टाकळी ते नांदूरपर्यंत ३० मीटर डीपी रोडवर नवीन पूल बांधणे.
  • दसक नांदूर दसक सर्वे नंबर ८३ मधून जाणाऱ्या डीपी रोडवर नियोजित पूल बांधणे.
  • गोदावरी नदीवर दसक गाव जुना घाट ते जनार्दन स्वामी पुलापर्यंत संरक्षण भिंत बांधून नवीन घाट तयार करणे.
  • दसक गाव चौफुली ते टाकळी रोड मलनिस्सारण केंद्र डीपी रोड रुंदीकरण व काँक्रिटीकरण करणे.
  • नाशिकरोड रेल्वेस्थानक ते बिटको चौक पुढे जेल रोड छत्रपती संभाजीनगर रोडपर्यंत तीस मीटर डीपी रोड काँक्रिटीकरण करणे.
  • दत्त मंदिर चौक ते द्वारका चौकापर्यंत उड्डाण पुलासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणे.
  • दिशादर्शक फलकावरील अतिक्रमण काढणे.
  • गोदावरी नदीवरील दसक येथील घाट समांतर रेषेत करून नदीतील अतिक्रमण काढून प्रवाह वाहता करणे.

पंचवटी परिसर

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कुंभमेळासंदर्भात पंचवटी आणि रामकुंड परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेणार.
  • गोदावरी नदीच्या स्वच्छतेबाबत विशेष बैठक, वाहतूक सुधारणा, भाविकांसाठी सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था यांवर चर्चा होणे अपेक्षित.
  • पंचवटी परिसरातील वाहतूक सुधारण्यासाठी पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था.

याकडे लक्ष असावे

घाटांची संख्या, स्स्ते, रेल्वे व हवाई वाहतुकीचे नियोजन, नाशिक- त्र्यंबक रस्ता २४ मीटरने केव्हा वाढणार?, रस्त्यांच्या कडेला टेंट सिटी उभारणार का ? नाशिकरोड, लहवित, उंबरमाळी, इगतपुरी, कसारा, ओढा, देवळाली कैम्प आदी स्थानकांमध्ये नव्याने सोयीसुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...