Sunday, November 1, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ कुंभमेळा : गोदामाईच्या कृपेने दुष्काळाचे सावट दूर होवो; महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम्...

सिंहस्थ कुंभमेळा : गोदामाईच्या कृपेने दुष्काळाचे सावट दूर होवो; महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होवो – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

नाशिक | जिमाका वृत्तसंस्था

- Advertisement -

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पवित्र धर्मध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीबद्दल त्यांचे आभार मानले. सिंहस्थ कुंभमेळा हा भारतातील सर्वात मोठ्या धार्मिक सोहळ्यांपैकी एक असून, जात-पात, धर्म किंवा सामाजिक भेदांच्या पलीकडे जाऊन सर्वांना अध्यात्माच्या धाग्याने जोडणारा श्रद्धेचा महासंगम असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिकची भूमी आणि गोदावरी नदीचे अनन्यसाधारण आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करताना आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचे ऐतिहासिक आणि भव्य आयोजन महाराष्ट्र शासन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा कुंभमेळा स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी गोदावरीच्या स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबरोबरच सामाजिक संस्थांनीही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीविषयी चिंता व्यक्त करताना ‘गोदामाईच्या कृपेने महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर होवो, बळीराजाच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो आणि महाराष्ट्राची भूमी पुन्हा एकदा सुजलाम् सुफलाम् होवो,’ अशी भावपूर्ण प्रार्थना राज्यपाल वर्मा यांनी गोदाकाठी केली.

ताज्या बातम्या

आदिवासी कला-संस्कृतीचा नाशिकमध्ये जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ला प्रारंभ

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देत ‘भगवान बिरसा कला संगम २.०’च्या नाशिक विभागीय...