Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजSimhastha Kumbhmela 2027 : कुंभमेळ्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडून महत्वपूर्ण स्थळांची...

Simhastha Kumbhmela 2027 : कुंभमेळ्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडून महत्वपूर्ण स्थळांची पाहणी

व्यापक विकास आणि नियोजनास मिळणार गती

नाशिक | प्रतिनिधी Nashik

आगामी कुंभमेळा २०२७ च्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त समन्वयाने पंचवटी विभागातील महत्त्वाच्या ठिकाणांची पाहणी करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा व नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष पाहणी करत कुंभमेळ्यासंदर्भातील आवश्यक बाबींचा आढावा घेतला.

- Advertisement -

पाहणी दरम्यान महत्त्वाच्या विकासकामांचा समावेशासह योजना पूर्णत्वास नेण्यासाठी ठोस कार्यवाहीचे तसेच कुंभमेळा २०२७ साठी सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी तत्काळ नियोजन व कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले.

अशी आहेत महत्वाची विकासकामे

१) साधूग्राम ते रामकुंड अमृत मिरवणूक मार्ग व परतीचा मार्ग
काँक्रीट रस्त्यांचे नूतनीकरण व रुंदीकरण
रस्त्यालगत पौराणिक व रामायणकालीन भित्तीचित्रे रंगवून सुशोभीकरण
अतिक्रमण व अनधिकृत बांधकामे हटविणे

२) भाजी मार्केट पुनर्विकास व स्थलांतर
 नदीघाट परिसरातील भाजीबाजाराचे स्थलांतर
 गाडगे महाराज पुलालगत अमृत मिरवणुकीसाठी डाऊन रॅम्प बांधणी

३) वाघाडी नदी सुशोभीकरण व प्रवाह नियोजन
 नदीतील सांडपाणी प्रवाह अडविणे व वळविणे
 वाघाडी नदीच्या काठावर व्ह्यू कटर भिंत आणि पर्यावरणपूरक सुशोभीकरण

४) नदीकाठचा भाविक शाही मार्ग आणि पादचारी पूल
 टाळकुटेश्वर पुलाजवळ सांडवा पूल बांधणी

५) रामकाल पथ अंतर्गत संपादन करावयाच्या ठिकाणांची पाहणी

६) वाहतूक आणि पूल सुधारणा
 भिकूसा पेपर मिल येथील नवीन पूल सुरू करण्यासाठी MSEB खांब स्थलांतर
 NIT कॉलेज ते हिरावाडी रोड पूलासाठी मिसिंग लिंक संपादन

७) भाविक ग्राम, तात्पुरती निवास व्यवस्था आणि सांस्कृतिक कार्यक्रम
 मिनाताई ठाकरे स्टेडियम, हिरावाडी नाट्यगृह, महानगरपालिकेच्या मोकळ्या जागांसाठी एकत्र क्लस्टर तयार करून भाविक ग्राम व टेंट सिटी उभारणी
 कुंभमेळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रामकथा स्टेज शो, डिजिटल म्युझियम यांचा समावेश

८)वाहतूक व पार्किंग नियोजन
 अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी ई-रिक्षा व मोटारसायकल सेवा
 पेठरोड येथील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड येथे वाहनतळ विकसित करणे

९) आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा उपाययोजना
 संभाव्य आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे
 गर्दी नियंत्रणासाठी विशेष यंत्रणा व सुरक्षा उपाय

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...