धुळे ।dhule । प्रतिनिधी
शहरानजीक असलेल्या अवधान एमआयडीसीतील डिसान अॅग्रो टेक कंपनीची तब्बल 55 ते 60 लाखात फसवणूक झाली आहे. याप्रकरणी मापातपाप करणारर्या कंपनीतील तिघांवर मोहाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
breaking # अमळनेरात उष्माघाताचा पहिला बळी जिल्ह्यात उष्णतेची लाट; पारा 44.9 अंशावर
याबाबत कंपनीचे अशोक मुकुंदा सोनार (वय 52 रा. महालक्ष्मी कॉलनी, शिरपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अवधान येथील डिसान अॅग्रो टेक प्रा.लिमध्ये कंपनीतील इले. वजन काट्यावरील ऑपरेटर अमित संजय कासार (रा. वाखारकर नगर, धुळे), विकास भटू पानगे (रा. मोहाडी) व प्रमोद दिलीप सोनवणे (रा. सौंदाणे) यांनी संगनमत केले.
जळगावच्या म्हाळसेची ही आहे VISUAL STORY, स्टोरीत नथीचा नखरा करतोय सर्वाना घायाळपाचोर्यात पहाटेचा थरार : अन् क्षणात चौघांना चिरडले
दि.1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कंपनीत डिओसी पेंड माल खरेदीसाठी येणार्या वाहनांमध्ये ऑर्डरप्रमाणे भरून दिल्यानंतर वाहनाचा वजन काटा वाहन कंपनीच्या बाहेर सोडून कंपनीचे गेटवरील सिक्युरीटी गार्डमार्फत वाहन पुन्हा कंपनीत आणून त्यामध्ये वेळोवेळी एक ते दोन टन वजनाचा डीओसी पेंडमाल प्रति टन 50 हजार रूपयांप्रमाणे अधिक भरून त्या मोबदल्यात संबंधीतांकडून मिळणारी रक्कम आपआपसात वाटून घेतली.
VISUAL STORY : ५४ व्या वर्षीही या अभिनेत्रीने गुलाबी साडीत तापवलं वातावरणVISUAL STORY # मानसी नाईक पुन्हा नववधू ?photo# लोणी येथून विवाहिता तीन मुलांसह बेपत्तापहिलीला न सोडता दुसरीसोबत घरोबा, अक्षताऐवजी हातात पडली बेडी
स्वतःच्या फायद्यासाठी वरील मालाची चोरी करीत विश्वासघात केला. कंपनीच्या परवानगीशिवाय 55 ते 60 लाख रूपये किंमतीच डिओसी पेंड वाहनांमध्ये अधिक भरून कंपनीची फसवणूक केली. पुढील तपास एपीआय भुषण कोते करीत आहेत. पोलिसांनी अमित कासार व विकास पानगे यांना अटक केली आहे.
जळगावचे एसटी आगार झाले अखेर मालामाल