Wednesday, April 2, 2025
Homeक्रीडा‘थॉमस अ‍ॅण्ड उबर’ स्पर्धेत सिंधू होणार सहभागी

‘थॉमस अ‍ॅण्ड उबर’ स्पर्धेत सिंधू होणार सहभागी

नवी दिल्ली – New Delhi

विश्वविजेती भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू यावर्षी ‘थॉमस अ‍ॅण्ड उबर’ चषकात खेळणार आहे. यापूर्वी…

- Advertisement -

तिने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला होता. मात्र ती आता 3 ते 11 ऑॅक्टोबरदरम्यान होणार्‍या या स्पर्धेत खेळणार आहे.

बॅडमिंटन असोसिएशन ऑॅफ इंडियाचे (बीएआय) अध्यक्ष हिमंता बिसवा सरमा यांच्या आदेशानुसार सिंधूने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय मागे घेतला आहे. वैयक्तिक कारणांमुळे या स्पर्धेत खेळणार नसल्याचे सिंधूने सांगितले होते.

हिमंता म्हणाले, ‘सिंधूने या स्पर्धेत खेळण्याचे मान्य केले आहे. कौटुंबिक कार्यक्रम आधी उरकून घेऊन ती भारतीय संघात सामील होणार आहे.”

सिंधूने सध्या हैदराबादमधील पुलेला गोपीचंद अकादमीतील राष्ट्रीय बॅडमिंटन शिबिरात भाग घेतला आहे. शिबिरात भारतीय बॅडमिंटनचे 26 खेळाडू सहभागी झाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Waqf Amendment Bill : ‘वक्फ’ म्हणजे काय? विधेयकात नेमकं काय आहे?...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक (Waqf Amendment Bill) आज केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू (Kiran Rijiju) यांनी लोकसभेत...