मुंबई | Mumbai
कोकणातून (Kokan) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सिंधुदुर्गच्या (Sindhudurg) जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील (sawantwadi) घनदाट जंगलात विदेशी महिला (Foreigner Woman) लोखंडी साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे या महिलेला तिच्या नवऱ्यानेच बांधून ठेवल्याची माहिती समोर येत आहे. महिलेनं स्वतःच एका कागदावर लिहून याबाबत सांगितले. (Foreigner Woman Tied To Tree And Was Chained In Her Leg In Sindhudurg Jungle)
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गच्या जिल्ह्यातल्या सावंतवाडीतील घनदाट जंगलात काही गुराखी नेहमीप्रमाणे आपली गुरं चारण्यासाठी जंगलातील काही भागांमध्ये घेऊन गेले होते. तिथे त्या गुरख्यांना एक विदेशी महिला झाडाला बांधलेल्या अवस्थेत दिसली.
हे ही वाचा : शपथविधीवेळी नार्वेकरांकडून उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा उल्लेख; तर गवळी यांची ‘जय…
त्यानंतर गुराख्यांनी याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. झाडाला बांधलेल्या अवस्थेत असलेल्या महिलेला सोडून नंतर तिला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
सदर घटनेबाबत पोलीसांकडून तपास सुरु आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कायी कुमार एस. ही उच्चशिक्षित असून ती योगाचे शिक्षण घेण्यासाठी दहा वर्षांपूर्वी भारतात तामिळनाडू येथे आली होती. त्यापूर्वी काय कुमार एस. ही अमेरिकेत प्रसिद्ध बॅले डान्सर व योग शिक्षक होती.
हे ही वाचा : शिंदे गटाचा श्रीरामपूर, नेवासा मतदारसंघांवर डोळा
उपचारानंतर तिने एका चिठ्ठीवर इंग्रजीत तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराबद्दल लिहिलं. आपल्या पतीने अत्याचार करून इंजेक्शन दिलं व जंगलात बांधून ठेवल्याची माहिती दिली होती. त्या चिठ्ठीत तिने असा दावा केलाय की, गेल्या ४० दिवसांपासून ती त्या जंगलात होती. तिथे ती ४० दिवसांपासून उपाशी होती. पतीने दिलेल्या इंजेक्शनमुळे तिचा जबडा उघडत नव्हता.