Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनगायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला, कॉन्सर्ट दरम्यानच घडला सारा प्रकार

गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला, कॉन्सर्ट दरम्यानच घडला सारा प्रकार

कर्नाटक | Karnataka

आपल्या आवाजामुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असणारे बॉलिवूडचे लोकप्रिय गायक कैलाश खेर (Kailash Kher) आज एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. कैलाश यांच्यावर कर्नाटकात (Karnataka) हल्ला झाला आहे. दरम्यान, आरोपीला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

‘प्रेमपुजारी’ला ५० वर्ष पुर्ण, आपल्या नगर जिल्ह्याशी आहे खास आठवणी

कर्नाटकातील हंपी महोत्सवादरम्यान गायक कैलाश खेर यांच्यावर पाण्याची बाटली फेकण्यात आली . कैलाश खेर स्टेजवर परफॉर्म करत असतानाच दोन तरुणांनी त्यांना कन्नड गाणं गाण्याचा आग्रह केला होता. रविवार संध्याकाळी ही घटना घडली आहे. दरम्यान पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.

तीन दिवस चाललेला हम्पी महोत्सव २७ जानेवारीपासून सुरू झाला आहे. विजयनगर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर प्रथमच तेथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन शुक्रवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते झाले.

धक्कादायक! आरोग्य मंत्र्यांवर भर चौकात झाडल्या गोळ्या, प्रकृती गंभीर

या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड आणि कन्नड गायकांनी परफॉर्म केले. त्यात जागतिक वारसा असलेल्या स्थळाचे वैभव दाखविण्यासाठी साऊंड अँड लाईट शोचेही आयोजन करण्यात आले होते. कन्नड पार्श्वगायक अर्जुन, विजय प्रकाश, रघु दीक्षित आणि अनन्या भट यांनी कार्यक्रमात सादरीकरण केले.

“राजा का बेटा राजा नही बनेगा” म्हणत, सत्यजीत तांबेंच टेन्शन वाढवणाऱ्या शुभांगी पाटील आहेत तरी कोण?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या