Saturday, July 27, 2024
HomeनाशिकVideo : नाशिक सायकलिस्ट्सकडून स्वातंत्र्यदिनी '75' आकारात उभे राहून राष्ट्रगीत गायन

Video : नाशिक सायकलिस्ट्सकडून स्वातंत्र्यदिनी ’75’ आकारात उभे राहून राष्ट्रगीत गायन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनच्या (Nashik Cyclists Foundation) वतीने छत्रपती शिवाजी स्टेडियम ग्राउंड येथे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने नाशिक सायकलिस्ट ग्रीन जर्सी परिधान करून एका तालासुरात राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम झाला.

- Advertisement -

अमृत महोत्सवी वर्ष अनोख्या रितीने साजरे करावे यासाठी 75 सायकलिस्ट्सने 75 या क्रमांकाचे फॉर्मेशन अभिमानाने केले. यावेळी राष्ट्रगीत (National anthem) गाऊन राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली.

हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी उल्हास कुलकर्णी, जाकिर पठाण, पुष्पा सिंग, राजेश्वर सूर्यवंशी, खजिनदार रवींद्र दुसाने, सचिव डॉ. मनिषा रौंदळ यांनी परिश्रम घेतले

राष्ट्रगीत गायनाचा व्हिडिओ केंद्र शासनाला (Central government) पाठविण्यात आला. केंद्राने यासाठी सर्टीफिकेटदेखील दिले आहे. देशप्रेमासाठी सर्व सायकलिस्ट्सने एकत्र येऊन हा अनोखा उपक्रम पार पडला, असे मत अध्यक्ष राजेंद्र वानखेडे (Rajendra Wankhede) यांनी व्यक्त केले. उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक (Ravindra Naik) यांचे सहकार्य लाभले.

- Advertisment -

ताज्या बातम्या