Wednesday, April 29, 2026
HomeनाशिकNashik News: सिंहस्थपूर्व रस्ते कामांचा फटका; वाहतूककोंडीविरुद्ध 'डिजिटल आवाज'

Nashik News: सिंहस्थपूर्व रस्ते कामांचा फटका; वाहतूककोंडीविरुद्ध ‘डिजिटल आवाज’

नाशिक | प्रतिनिधी
आगामी सिंहस्थासाठी शहरातील प्रमुख चौकांपासून अंतर्गत गल्लीचोळांपर्यंत सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीमुळे नाशिकची वाहतूक अडथळ्यांची शर्यत पार करत आहे.

मार्ग बदल, अरुंद रस्ते आणि अपुरी माहिती यामुळे दररोज वाहतू‌क कोंडी व बेशिस्त वाहनचालकांचे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी थेट पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हॉटस्अॅप हेल्पलाईनचा प्रभावी वापर सुरू केला असून, वाहतुकीबाबतच सर्वाधिक तक्रारी दाखल होत आहेत. वाहतूककोंडी, रॅश ड्रायव्हिंग, बेशिस्त रिक्षाचालक, नियमभंग करणारी वाहने यांचे फोटो व व्हिडिओ थेट पोलिसांकडे पाठवले जात आहेत.

- Advertisement -

आतापर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी तब्बल १,५११ तक्रारी वाहतुकीशी संबंधित आहेत. याशिवाय रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या साऊंड सिस्टिममु‌ळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाविरोधातही संताप व्यक्त होत आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सुरू असलेल्या या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींवर दखल घेतली जात असून वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुषार अढावू हे नोडल अधिकारी म्हणून तक्रारींचे वर्गीकरण करून संबंधित अंमलदारांना त्वरित आवश्यक सूचना व निर्देश देत आहेत. विशेष म्हणजे, कारवाईनंतर नागरिकांकडून फिडबॅक घेतला जात आहे. वाहतूकच नाही तर हेल्पलाईनद्वारे टवाळखोरांवर कारवाई, अंमली पदार्थ विक्रीबाबत माहिती, महिला सुरक्षेच्या तक्रारी, अवैध धंदे व संशयित हालचाली याबाबतही ठोस कारवाई सुरू आहे.

Malegaon Mayor Election: मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालीद हाजी तर उपमहापौरपदी सपा च्या शान-ए-हिंद विजयी

‘स्मार्ट पोलिसिंग’, नाशिककर रिपोर्टर
वाहतूक व्यवस्थेतील अडचणी हे सिंहस्थपूर्व मोठे आव्हान ठरत असताना नागरिकांचा डिजिटल सहभाग आणि पोलिसांची तत्परता हे शहरासाठी दिलासादायक चित्र आहे. ‘तक्रार करा, पुरावा पाठवा आणि कारवाई पाहा’ हा विश्वास वाढत असून नाशिकमध्ये नागरिक-पोलीस भागीदारीचे नवे मॉडेल आकार घेत आहे. त्यामुळे नाशिककर ‘रिपोर्टर’ बनल्याची चर्चा आयुक्तालयात सुरू आहे.

आकडे सांगतात
आतापर्यंत एकूण मेसेजेस १३,९४०
निकाली काढलेल्या तक्रारी ६,१५८
प्रक्रियेत ३३१
प्रलंबित ९२८
कार्यक्षेत्राबाहेर ८४१

विषयनिहाय तक्रारी
वाहतूक १,५११
ध्वनिप्रदूषण ३८०
पोलीस ठाणेसंबंधित: ४,८६२
महिलांबाबत १३०
गस्त ३०
अंमली पदार्थ ७४

ताज्या बातम्या