Thursday, September 10, 2026
HomeनगरAhilyanagar : एकाही पक्षाकडे नाहीत 100 टक्के बूथ प्रतिनिधी

Ahilyanagar : एकाही पक्षाकडे नाहीत 100 टक्के बूथ प्रतिनिधी

‘एसआयआर’ मोहिमेत 124 बीएलओचे काम 40 टक्क्यांच्या आत

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मतदार यादीचे विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम यशस्वी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना सहभागी करुन घेतले आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर बीएलओंच्या (मतदान केंद्रस्तरीय अधिकारी) मदतीसाठी राजकीय पक्षांनी बीएलए (बूथ-स्तरीय प्रतिनिधी) नियुक्त केले आहेत. नगर जिल्ह्यातील 3 हजार 830 मतदान केंद्रावर 12 हजार 74 बीएलए नियुक्त करण्यात आले असून सत्ताधारी भाजपला दोन, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सात आणि शिवसेनेला नऊ मतदारसंघात शंभर टक्के बीएलए नियुक्त करता आले नाहीत.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीत प्रतिनिधींना जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. गणना प्रपत्र भरुन घेताना बीएलओंना मतदार अनुपस्थित, स्थालांतरित, मयत आणि दुबार आढळून आल्यास त्यांची वेगळी यादी तयार केली जात आहे. या यादीची पडताळणी करण्याची जबाबदारी बीएलए यांच्यावर देण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात बारा मतदारसंघात 3 हजार 830 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सर्व राजकीय पक्षांचे मिळून 12 हजार 74 बीएलए नियुक्त आहेत. एकाही पक्षाला शंभर टक्के मतदार केंद्रावर बीएलए नियुक्त करता आले नाही. भाजपने 3 हजार 591, काँग्रेसने 1 हजार 761, राष्ट्रवादीने (अजित पवार) 2 हजार 234, राष्ट्रवादीने (शरद पवार) 712, उद्धवसेनेने 1 हजार 343 व शिंदेसेनेने 2,074 बीएलए नियुक्त केले आहेत. तर बीएसपी 15, मनसे 23, आप 8 आणि इतर 313 बीएलए नियुक्त आहेत.

पारनेर, संगमनेरमध्ये भाजप तोकडी
भाजपने संगमनेर मतदारसंघात 288 पैकी 256 व पारनेर मतदारसंघात 366 पैकी 159 बीएलए नियुक्त केले आहेत. काँग्रेसला कोपरगाव, राहुरी व श्रीगोंदा मतदारसंघात एकही बीएलए मिळाली नाही. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला शिर्डी, संगमनेर, नेवासा व राहुरी मतदारसंघात शून्य बीएलए आहेत. तर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने संगमनेर, राहुरी व कर्जत-जामखेड मतदार संघात बीएलए नियुक्त केले आहेत. उद्धव सेनेला अकोले, शेवगाव, नगर शहर व श्रीगोंदा मतदारसंघात शून्य बीएलए आहेत. शिंदेसेनेचे अकोले, पारनेर मतदारसंघात एकही बीएलए नाही.

मनसे, आप आणि एनपीपीची अवस्था वाईट
जिल्ह्यात मनसे आप, बहुजन समाजवादीसह एनपीपी (नॅशनल पिपल्स पार्टी) यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. यातील आपकडे अवघे 8, मनसेकडे 23 तर बसपाकडे 15 आणि एनपीपीकडे एकही बीएलए नाहीत. तर उर्वरित लहान मोठ्या पक्षाकडे 313 बीएलए असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Accident News : आयशर टेम्पो आणि कारची भीषण धडक ; एकाच...

0
अहिल्यानगर |तालुका प्रतिनिधी| Ahilyanagar नगर-कल्याण महामार्गावर (Nagar-Kalyan Highway) भाळवणी गावच्या शिवारात हॉटेल संदीप समोर गुरुवारी (दि. 10) पहाटे दोनच्या सुमारास आयशर टेम्पो (Eicher Tempo) आणि...