Saturday, September 12, 2026
HomeनगरShevgaon News : शेवगावच्या उपनगराध्यक्षपदी सिराजुद्दीन पटेल बिनविरोध

Shevgaon News : शेवगावच्या उपनगराध्यक्षपदी सिराजुद्दीन पटेल बिनविरोध

शेवगाव। तालुका प्रतिनिधी

शेवगाव नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सिराजोद्दीन पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. या पदाच्या निवडणुकीसाठी आज दि. १५ रोजी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.

- Advertisement -

यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजप, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा समावेश होता. मात्र, सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार सिराजुद्दीन पटेल यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

शेवगाव नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी एकूण ६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. १२. ४५ वाजता उमेदवारी मागे घ्यायची शेवटची वेळ होती. उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून सिराजोद्दीन पटेल व निलेश रोकडे यांनी तर शिवसेनेचे आशुतोष डहाळे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वजीर पठाण , भाजपकडून सागर फडके व नितीन दहिवाळकर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

मात्र पटेल वगळता इतर सर्वांनी उमेदवार अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार वक्षाचे सिराजोद्दीन पटेल यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. स्विकृत नगरसेवक पदासाठी सर्व पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये मोठी स्पर्धा लागली होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडुन अजिंक्य लांडे, भाजपा कडुन गणेश कोरडे तर शिवसेनेकडून साईनाथ आधाट यांची निवड करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : १२ सप्टेंबर २०२६ – शेतकरीवर्गासाठी कडवट निर्णय

0
भारत हा कृषिप्रधान देश असल्याचा अभिमान आपण बाळगतो; परंतु देशाच्या अर्थकारणात आणि धोरणात्मक निर्णयांमध्ये अन्नदाता असलेला शेतकरी नेहमीच दुर्लक्षित राहतो. शेतकर्‍याने उत्पादित केलेला कांदा...