Sunday, June 23, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंना धमकीवरुन सभागृहात खडाजंगी : SIT चौकशीची घोषणा

आदित्य ठाकरेंना धमकीवरुन सभागृहात खडाजंगी : SIT चौकशीची घोषणा

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांना देण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करणार असल्याची घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली. आदित्य ठाकरे यांना देण्यात आलेल्या धमकी प्रकरणाची विधानसभेत (Assembly Session)चर्चा झाली. यावेळी आरोपीच्या कर्नाटक संबंधावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजपमध्ये (bjp)जोरदार खडाजंगी झाली. कर्नाटक सरकारकडून सहकार्य मिळत नसेल तर मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा करेल, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांनी सांगितलं

- Advertisement -

शिक्षणमंत्र्याची माहिती : शाळा पुन्हा बंद होणार?

विधानसभेत झालेल्या चर्चेनंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आदित्य ठाकरे धमकी प्रकरणातील आरोपीला बंगळुरूमधून अटक करण्यात आली असल्याची माहिती दिली. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून एसआयटी मार्फत चौकशी होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

तत्पूर्वी, विधानसभेत शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी हा मुद्दा मांडला. आदित्य ठाकरे यांना धमकी देणाऱ्या आरोपींचा संबंध कर्नाटकशी असल्याच्या कारणाने महाविकास आघाडी आणि भाजप आमदारांमध्ये खडाजंगी झाली. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी म्हटले की, आरोपी हा कर्नाटक मध्ये सापडला आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांची हत्येचे धागेदोरे कर्नाटकमध्ये आहेत. या प्रकरणाचे काही धागेदोरे आहेत का, याचा उहापोह झाला पाहिजे. कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असल्याचा मुद्दा प्रभू यांनी मांडला. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आयपीएस अधिकाऱ्याच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी सनातन संस्थेवर बंदी घालण्याबाबतचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

रणबीरच्या प्रश्नावर आलिया का लाजली?

- Advertisment -

ताज्या बातम्या