Sunday, September 8, 2024
Homeनगरसितानगर नाल्यावर पूल तयार करावा : गोंदकर

सितानगर नाल्यावर पूल तयार करावा : गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी शहरातील सितानगर, आंबेडकर नगर रहिवाशी भागात नाल्याला आलेल्या पुरामुळे नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

या नाल्यावर सितानगर तसेच आंबेडकरनगर येथील पुलाखाली टाकण्यात आलेले सिमेंटचे पाईप काढून त्याठिकाणी पक्के ब्रिज तयार करावे जेणेकरून पाण्याचा प्रवाह मोकळा होईल, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर यांनी केली.

शिर्डी शहरात गेल्या आठ ते दहा दिवसांंपासून पश्चिम भागातील गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी शहरातील उपनगरात तसेच नाला नंबर 34 मध्ये येऊन पोहोचले आहे. त्यामुळे शहरातील नाल्यालगत असलेल्या आंबेडकरनगर तसेच सितानगर येथील रहिवाशांच्या घरात पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

वारंवार नगरपंचायतचे अधिकारी याठिकाणचे पाणी वळविण्यासाठी विविध उपाययोजना करत आहेत. या दोन्ही उपनगरांत रहिवाशांना येण्या-जाण्यासाठी या नाल्यावर पूल बांधण्यात आले आहेत. मात्र या पुलाखाली सिमेंटची अरुंद पाईपलाईन असल्याने पाणी वाहून जाण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याने सदरचे पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये शिरले आहे.

ही बाब शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या उपनगरात जाऊन पहाणी केली. यावेळी येथील नागरिकांशी चर्चा करून कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुलाखाली टाकलेले सिमेंटचे पाईप काढून कॉलम उभारून ब्रिज बनविण्यात यावे, असे नगरपंचायत प्रशासनाला सुतोवाच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या