Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik Political : सायलेंट व्होटरची कमाल; आमदारांना पुन्हा संधी

Nashik Political : सायलेंट व्होटरची कमाल; आमदारांना पुन्हा संधी

लाडक्या बहिणींची मोलाची भूमिका

नाशिक | Nashik

‘लाडक्या बहिणीं’चा मतदानावर (Voting) पडलेला परिणाम व राज्यात सरासरी सुमारे ६ टक्के महिलांची (Women) वाढलेली मतदान टक्केवारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पडद्यामागून झालेले काम आणि सायलेंट व्होटरची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महायुतीच्या पारड्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचे स्पष्ट होत आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) १५ मतदारसंघांमध्ये पुन्हा विद्यमान आमदारांनाच मतदारांनी संधी मिळाल्यामुळे व काहींचे फरक थेट लाखापर्यंत असल्यामुळे जिल्ह्यातील एक प्रकारे संभ्रमात असलेल्या मतदाराने मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या राज्यातील राजकीय गोंधळाला पूर्णविराम दिले. याबाबत दैनिक ‘देशदूत’ने १९ नोव्हेंबरच्या दैनिकात याबाबत विश्लेषण करून विशेष फीचर प्रसिद्ध केले होते. त्यावर एक प्रकार शिक्कामोर्तब झाल्याची रंगत आहे. राज्यातील २८८ नाशिक जिल्ह्यातील १५ चर्चा जिल्ह्यात मतदारसंघांपैकी मतदारसंघांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची बारीक नजर होती.

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजूच्या मोठ्या नेत्यांच्या सभा या ठिकाणी झाल्या, मात्र २० ते ४० वयोगटातील तरुण मतदार सायलेंट व संभ्रमावस्थेत दिसत होता. त्यामुळे त्याच्या भूमिकेकडे लक्ष लागून होते. तर २० नोव्हेंबर रोजी झालेला चांगला मतदान व त्यानंतर दोन दिवसांपूर्वी आलेल्या निकालात त्यांची स्पष्ट भूमिका समोर आली. राज्यात एकूण सरासरी महिलांच्या मतांमध्ये ६ टक्के वाढ झाली. हा थेट लाडक्या बहिणींचा परिणाम दिसत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अत्यंत खालच्या पातळीवर व व्यक्तिगत आरोप- प्रत्यारोपांचाच जोर दिसून आला, तर महत्त्वाच्या मुद्यांवर ज्याप्रमाणे नेत्यांनी बोलायला हवे होते, तसे काही न दिसल्याने तरुण मतदार काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे होते. २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या काळात राज्यातील राजकारणात उडालेला गोंधळ, झालेले नवनवीन प्रयोग व तीन वेळा सत्ता स्थापन झाल्याने तरुण मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

राज्यातील राजकारण (Political) २०१९ पासून मोठ्या प्रमाणात बदलला आहे. त्यात अनेक चढउतार आले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला सत्तेचा कौल दिला होता, मात्र नंतर शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर घरोबा करुन महाविकास आघाडीची स्थापना करून राज्यातील सत्ता काबीज केली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्यावेळी राज्यातील जनतेला एक मोठा राजकीय गोंधळ पहायला मिळाला. कारण याच काळात भाजपचे देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अजीत पवार यांचा पहाटेला शपथविधी देखील झाला होता. काही तासांसाठीच ते सरकार राहिले हे देखील खरे आहे. यानंतर दोन वर्ष साधारण करोना काळ राहिला. करोना संपल्यानंतर पुन्हा राज्यात राजकीय भूकंप झाला. या सगळ्या गोंधळात तरुण व युवा मतदाराच्या मनात एक प्रकारे चिड निर्माण झाली होती, ती आता मतदान यंत्रातून बाहेर आली.

संघ स्वयंसेवकांचे परिश्रम

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) संघाची फारशी भूमिका नसल्याने त्याचा थेट परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून आला होता. विशेष करून पाहिजे त्या प्रमाणात हिंदू मतदार बाहेर न पडल्याने व दुसरीकडे इतर समाजात लोकसभा निवडणुकीत दिसलेल्या उत्साहामुळे भाजपला एक प्रकारे फटका बसला होता. तशी अवस्था विधानसभा निवडणुकीत नको म्हणून यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महत्वाची भूमिका घेत निवडणुकीत भाजपच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. संघाचा प्रत्येक स्वयंसेवक विधानसभा निवडणुकीत अॅक्टिव मोडवर होता. यंदा स्वयंसेवकांनी भाजपच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी परिश्रम घेतल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम देखील भाजपच्या विजयात पहायला मिळत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...