Wednesday, July 24, 2024
Homeनाशिकश्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर सहा नवीन विश्वस्तांची निवड

श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टवर सहा नवीन विश्वस्तांची निवड

त्र्यंबकेश्वर | मोहन देवरे Trimbakeshwar

- Advertisement -

श्री त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट वर 6 नवीन विश्वस्त नेमण्यात आले आहे. धर्मदाय आयुक्त टी. एस अकाली यांच्याकडून मुलाखती द्वारे निवड करून नावे जाहीर झाली आहे.धर्मदाय खात्याकडे 165 अर्जदारांनी मुलाखती दिल्या होत्या.

यातून भाविकांसाठी चार विश्वस्त पुढील प्रमाणे नेमण्यात आले आहे.

कैलास वसंतराव घुले.

रूपाली पंकज भुतडा.

पुरुषोत्तम मधुकर कडलग.

स्वप्निल दिलीप शेलार.

वरील चार जण मुलाखतीतून निवडण्यात आले.

मंदिराशी संबधित घटक म्हणून

पुरोहित संघाचे प्रतिनिधी मनोज विनायक थेटे.

त्रंबकेश्वर मंदिरातील त्रिकाल पूजक प्रतिनिधी सत्यप्रिय ज्ञानेश्वर शुक्ल.

अशी निवड झालेल्या दोघांची नावे आहेत.

वरील नावे धर्मदाय आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली आहे.मागील विश्वस्तांची मुदत चार जुलै रोजी संपल्याने पुढील पंच वार्षिक निवडीसाठी वरील विश्वस्त आहे.भाविकांसाठी सेवा देण्यास तत्पर राहणार असल्याचे नव निर्वाचित विश्वस्तांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या