Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यामणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला; एका जवानासह ६ जणांचा मृत्यू, काही भागात घरांची...

मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा भडकला; एका जवानासह ६ जणांचा मृत्यू, काही भागात घरांची जाळपोळ

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये (Manipur) जातीय हिंसाचार (Violence) उफाळला असून तो अजूनही सुरूच आहे. अशातच आता मणिपूरात गेल्या २४ तासांत अनेक हिंसक घटना घडल्या असून या घटनेत सहा जणांचा मृत्यू तर काही भागात घरांची जाळपोळ करण्यात आली आहे…

- Advertisement -

लोकल ट्रेन सीरियल बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांना आला फोन; मुंबईत एकच खळबळ

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशिरापर्यंत अनेक भागात गोळीबार सुरू होता. क्वाटा परिसरात मेईतेई समाजातील (Meitei community) तीन लोकांची त्यांच्या घरातच हत्या करण्यात आली. हत्येनंतर हल्लेखोरांनी मृतदेहांचीही (Dead Body) नासधूस केली. तर काही तासानंतर चुराचांदपूर जिल्ह्यात (Churachandpur District) कुकी समाजातील (Kuki community) दोन लोकांची हत्या (Murder) करण्यात आली. या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या हत्यांचा काही संबंध आहे का, याचाही शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

Earthquake : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

दरम्यान, आतापर्यंत या हिंसाचारात १६० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याने मणिपूर रायफल्सच्या (Manipur Rifles) एका जवानासह किमान ६ जणांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

काही ठिकाणी इंटरनेट सेवा बंद

मणिपूर हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी काही ठिकाणी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. तसेच हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत हजारांहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले असून मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील (Bishnupur District) काही भागातून हिंसक जमावाने शस्त्रे आणि दारुगोळा लुटला आहे. तर मणिपूरात जमावाकडून सतत जाळपोळ आणि हल्ल्यांच्या घटना घडत आहेत. या घटनांमुळे काही ठिकाणी इंटरनेटसेवा बंद करण्यात आल्या असून अफवांवर विश्वास ठेवू नका,असे आवाहनही पोलिसांकडून (Police) करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या