नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी कॉंग्रेसचे राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा (Vijay Darda) आणि त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा (Devendra Darda) यांच्यासह सहा जणांना दोषी ठरवले असून या सगळ्यांना १८ जुलै रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे…
Cabinet Expansion : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर; खातेवाटपाचा तिढा लवकरच सुटणार
दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाचे विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी या घोटाळ्यात विजय दर्डा, देवेंद्र दर्डा यांच्याशिवाय माजी कोळसा सचिव एच.सी.गुप्ता, प्रशासकीय अधिकारी के.एस.क्रोफा, के.सी.समरिया आणि जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायवेट लिमिटेडचे माजी संचालक मनोजकुमार जैस्वाल यांना आयपीसीच्या कलम १२० बी, ४२० आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवले आहे.
भिमाशंकरला जाणाऱ्या बसचा अपघात ; प्रवाशांसह बस ओढ्यात कोसळली
दरम्यान, याआधी याप्रकरणात बऱ्याच लोकांना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये आयएएस अधिकारी समीर बिश्नोई, सौम्या चौरसिया, मुख्यमंत्र्यांचे उपसचिव सूर्यकांत तिवारी, कोळसा घोटाळ्यात सिंडिकेट म्हणून काम करणारे सुनील अग्रवाल अशा मोठ्या नावांचा समावेश आहे.