VIDEO : जम्मूच्या नरवालमध्ये दोन भीषण स्फोट; सहा जखमी

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

गेल्या अनेक दिवसांपासून दहशतवाद्यांच्या कारवायांना ऊत आला आहे. जम्मूच्या नरवालमध्ये दोन भीषण स्फोट झाले आहे. यामध्ये सहा जण जखमी झाले आहे. (Six people injured in two blasts that occurred in Narwal area of Jammu)

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

सध्या या स्फोटानंतर पोलिसांकडून आजूबाजूच्या भागात तपास सुरू करण्यात आला आहे. हा ब्लास्ट अपघाती होता की दहशतवादाशी निगडीत याबाबतचा तपास सुरू आहे. याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं समोर आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. यानंतर अर्ध्या तासाच्या फरकानं दुसरा स्फोट झाला सूत्रांच्या माहितीनुसार, या स्फोटासाठी महिंद्रा बोलेरे या वाहनाचा वापर करण्यात आला होता.

बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

सुहैल इक्बाल (वय ३५), सुशील कुमार (वय २६), विशाल प्रताप (वय २५), विनोद कुमार (वय ५२), अरुण कुमार तर अमित कुमार (वय ४०) आणि राजेश कुमार (वय ३५) अशी जखमी झालेल्या लोकांची नावं आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मूमध्ये सुरु आहे. यामध्ये शेकडो लोग सामील झाले आहेत. यापार्श्वभूमीवर हे दोन स्फोट झाल्यानं ही बाब गंभीर समजली जात आहे. त्यामुळं या घटनेनंतर सीआरपीएफ, आर्मी तसेच स्थानिक जम्मू आणि काश्मीर पोलीस अॅलर्ट मोडवर आले आहेत.

सुसंस्कृत पुण्यात चाललंय तरी काय? पुत्रप्राप्तीसाठी महिलेला खाऊ घातली मानवी हाडांची राखराजधानी पुन्हा हादरली! मद्यधुंद तरूणांनी तरुणीला ४ किमी फरफटवलं; हाडं तुटली, कपडे गळून गेले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *