Saturday, May 4, 2024
Homeनाशिकएसटी कर्मचाऱ्यांची मद्य पार्टी : सहा निलंबित

एसटी कर्मचाऱ्यांची मद्य पार्टी : सहा निलंबित

नाशिक | Nashik

चार पाच महिन्यापासून बंद असलेली बससेवा आता जिल्ह्यातील काही भागात सुरू झाली आहे. अशातच नाशकातील विभागीय कार्यालयातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतापाने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाच्या टेरेसवर मद्यपार्टी करणे सहा कर्मचाऱ्यांना चांगलेच भाेवले आहे. या सहा कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. या प्रकरणामुळे एसटी महामंडळाच खळबळ उडाली आहे.

शहरातील शिंगाडा तलाव येथे एसटी महामंडळाचे विभागीय कार्यालय असून या कार्यालयाच्या टेरेसवर गुुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारात सहा कर्मचाऱ्यांनी मद्य पार्टी केली. या प्रकाराबाबत माहिती पडताच एसटीचे सुरक्षा अधिकारी त्या ठिकाणी तपासणीसाठी गेले.

तेव्हा २ वाहतूक निरीक्षक, ३ सहायक वाहतूक निरीक्षक व १ चालक मद्य पित असल्याने आढळून आले. विभागीय कार्यालयातच या मद्यपार्टीची व एसटी कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त वर्तनप्रकरणी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत शनिवारी या सहाही कर्मचाऱ्यांचे निलंबन केले.

पार्ट्या नेहमीच्याय?

एसटीच्या विभागीय कार्यालयात रात्रीच्या वेळी अनेकदा काही कर्मचारी मद्यपार्टी करत असल्याचे बाेलले जात आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठाेस पावले उचलण्याची गरज असून हे प्रकार राेखण्यासाठी विभाग नियंत्रक काय पावले उचलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या