नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
ऑपरेशन सिंदूर स्थगित केल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे सर्च ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली होती. दोन ऑपरेशनमध्ये गेल्या ४८ तासांत सुरक्षा दलाने त्राल आणि शोपियानमध्ये राबविलेल्या दोन मोहिमांमध्ये सहा दहशतवादी मारले गेले आहेत.
काश्मीर झोनचे पोलीस महानिरीक्षक व्हीके बिर्दी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा दलाच्या कारवाईबाबतची माहिती दिली. काश्मीरमधील दहशतवादाला संपविण्यासाठी, दहशतीचे वातावरण संपविण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, सीआरपीएफ, भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलीस यांनी संयुक्तपणे राबविलेल्या दहशतवादी विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे बिर्दी यांनी सांगितले.
१२ मे रोजी आम्हाला दहशतवादी गट केलार आणि त्राल भागात असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार आम्ही या दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून होतो. १३ मेच्या सकाळी दहशतवाद्यांच्या हालचाली वाढल्याचे समजताच कारवाई केली. त्यांना घेरले असता त्यांनी आमच्यावर गोळीबार केला, प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात ते ठार झाले आहेत, असे जीओसी मेजर जनरल धनंजय जोशी यांनी सांगितले. एका गावाला घेरले तेव्हा दहशतवादी घरांमध्ये लपले आणि गोळीबार करू लागले. आमच्यासमोर सामान्य ग्रामस्थांना वाचविण्याचे आव्हान होते, असेही ते म्हणाले.
VIDEO | Awantipora: Addressing a press conference on six terrorists being killed in two encounters, VK Birdi, Inspector General of Police for Kashmir Zone, says, "In the wake of heightened terror activities in Kashmir Valley, all the security forces deployed here reviewed their… pic.twitter.com/oKzN72jwg8
— Press Trust of India (@PTI_News) May 16, 2025
“ठार मारण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी एक शाहिद कुट्टेचाही समावेश आहे. तो दोन मोठ्या हल्ल्यांमध्ये सहभागी होता, ज्यामध्ये एका जर्मन पर्यटकावर हल्ला केला होता. त्याचा कारवायांना निधी देण्यातही हात होता.” अशीदेखील माहिती मेजर जनरल धनंजय जोशी यांनी यावेळी दिली. दरम्यान, पत्रकार परिषदेत जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कठीण भूभागावर झालेल्या त्राल कारवाईत सैन्याने तीन दहशतवाद्यांना गोळ्या घालून ठार केले. पुलवामामध्ये ठार केलेले ३ दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मदचे होते. त्यांची ओळख आसिफ अहमद शेख, अमीर नजीर वाणी आणि यावर अहमद भट अशी झाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा