Monday, April 28, 2025
Homeधुळेजिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात सहा बाधितांचा मृत्यू

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेणार्‍या सहा जणांचा आज कोरोनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने 132 जणांचा बळी गेला आहे.

- Advertisement -

शहरातील शनीनगर येथील 44 वर्षीय पुरुष, गोकुळ नगरातील 65 वर्षीय पुरुश, बोरकुंड ता. धुळे येथील 80 वर्षीय पुरुष, देऊर येथील 65 वर्षीय महिला, कुसुंबा येथील 45 वर्षीय महिला, देवपूर (विंचूर) येथील 48 वर्षीय पुरुष हे कोरोनाने बाधीत होते.

त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरु होता. उपचार घेत असतांना या सहा जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 132 जणांचा बळी गेला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 66 आणि ग्रामीण भागात 66 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 2568 रुग्ण कोरोनामुक्त

धुळे जिल्ह्यात आतापर्यंत दोन हजार 568 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात धुळे महापालिका क्षेत्रात एक हजार 385, धुळे तालुक्यात 143, शिरपूर तालुक्यात 737, शिंदखेडा तालुक्यात 154 आणि साक्री तालुक्यात 149 रुग्णांचा समावेश आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २८ एप्रिल २०२५ – ही सामूहिक जबाबदारी

0
तापमानाच्या वाढत्या पार्‍याबरोबर राज्याच्या धरणातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. राज्यात सुमारे तीन हजार छोटे-मोठे जल प्रकल्प आहेत. सद्यस्थितीत त्या प्रकल्पांमध्ये सुमारे छत्तीस टक्के...