Friday, May 3, 2024
Homeनाशिकसंचारबंदी काळात क्रिकेट खेळणे अंगलट; सहा युवक पंचवटी पोलिसांच्या ताब्यात

संचारबंदी काळात क्रिकेट खेळणे अंगलट; सहा युवक पंचवटी पोलिसांच्या ताब्यात

नाशिक | प्रतिनिधी

संचारबंदी नियमाचे उल्लंघन करीत क्रिकेट खेळणाऱ्या सहा जणांना ताब्यात घेत पंचवटी पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. पंचवटीतील पेठरोडवरील दत्तनfगर समाज मंदिराच्या आवारात क्रिकेटचा डाव रंगलेला असताना पोलिसांनी छापा मारून ही कारवाई केली.

- Advertisement -

गौरव भाऊसाहेब दौंड (३१), तानाजी काळु धात्रक (३२) शंकर कचरू कांगणे (४१), अमोल शिवाजी नागरे (३१) वैभव शिवाजी देशमुख (२६) नितीन रामदास शेळके (३१ सर्व. रा. दत्तनगरनगर, पंचवटी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या युवकांची नावे आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्फ्यू लागू करण्यात आला असून, या काळात नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सातत्याने पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मात्र नागरिक या आवाहनाकडे कानाडोळा करीत आहे. टाईमपास करण्यासाठी एकत्रीत येणाऱ्या लोकांची संख्या मोठी आहे.

दत्तनगर समाजमंदिरात याच पद्धतीने काही लोक क्रिकेट खेळत असल्याची माहिती पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना मिळाली.

त्यानुसार लागलीच गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. एच. वानखेडे, हवालदार एस.एस.नरवडे, पोलिस नाईक पी.एस. जगताप, पोलिस शिपाई एम.व्ही.साळुंखे, व्ही.बी.चारोस्कर, यु.डी.खरपडे यांचे पथकाने ही कारवाई केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या