Thursday, May 1, 2025
Homeनगरकत्तलीसाठी चालविलले 2 लाख 80 हजारांचे गोवंश जनावरे पोलिसांनी पकडले

कत्तलीसाठी चालविलले 2 लाख 80 हजारांचे गोवंश जनावरे पोलिसांनी पकडले

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असताना देखील कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गोवंश हत्या सुरू असल्याचे दिसून आले आहे कोपरगाव तालुक्यात दोन ठिकाणी 2 लाख 80 हजाराचा गोवंश जनावरे पकडले असून कोपरगाव तालुका पोलिसांनी ही कारवाई केली आहे. यात् दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

तालुक्यातील मढी खुर्द गावात स्मशान भूमी जवळ आरोपी अब्दुल फारुक शेख राहणार ममदापूर हा त्याच्या ताब्यातील पिकप मध्ये 18 नर जातीचे जर्शी व गावरान वासरे दाटीवाटीने बांधून त्याची कत्तल करून गोमांस विक्री करण्याच्या उद्देशाने ही जनावरे निर्दयपणे दोरीने बांधून तोंडास काळी पट्टी लावून वाहतूक करीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या आरोपीच्या ताब्यातून गोवंश जातीची जनावरे व त्याच्या ताब्यातील पांढर्‍या रंगाची महिंद्रा पिकप (एमएच 17 बीडी 4070) असा एकूण दोन लाख 71 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मयूर माणिक विधाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम 1995 चे सुधारित कलम 5 (अ ) सह 9 तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पुढील तपास सहाय्यक फौजदार जी एस वांढेकर हे करीत आहे. दुसर्‍या घटनेत कोळपेवाडी गावाच्या शिवारात जामा मज्जीतीच्या पाठीमागे रोडवर मेहबूब शरीफ कुरेशी यांच्या मालकीच्या घरामध्ये आरोपी लतीफ शफिक कुरेशी याने गोवंश जातीच्या जनावरे कत्तल करून विक्री करण्याचे उद्देशाने तसेच जीवितास धोकादायक असलेले रोगांचा संसर्ग पसरविण्याचा संभव माहिती असतांना देखील त्यांनी गौंवश जातीची 7500 किमतीचे 25 किलो वजनाचे गोमास विक्रीसाठी जवळ बाळगताना मिळून आला आहे. वरील आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियमन 1995 चे कलम सुधारित कलम 5 (क ) व भादवि कलम 269 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक फौजदार जीएस वांढेकर हे करत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

India vs Pakistan War : मोठी बातमी! BSF ने भारत-पाकिस्तान सीमेवर...

0
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर (India Pakistan Border) प्रचंड तणाव बघायला मिळत आहे. भारत कुठल्याही क्षणी हल्ला करेल...