Saturday, March 29, 2025
Homeनगरकत्तलीसाठी चालवलेल्या 13 म्हशींचा टेम्पो पकडला गुन्हा दाखल

कत्तलीसाठी चालवलेल्या 13 म्हशींचा टेम्पो पकडला गुन्हा दाखल

सोनई |वार्ताहर| Sonai

अहमदनगर संभाजीनगर महामार्गावरील शिंगवेतुकाई परिसरात 13 म्हशी अवैधरित्या कत्तलीसाठी घेऊन जात असताना गोमाता स्वयंसेवकांनी रविवार दि. 18 रोजी पहाटे पकडल्या. यावरून दोघांवर सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत समजलेली माहिती अशी की जेऊर बायजाबाई तालुका नगर येथून छत्रपती संभाजीनगरकडे एका टेम्पोमध्ये कत्तलीसाठी जनावरे भरून जात असल्याची माहिती गोमाता स्वयंसेवकांना कळाली. सोनई पोलिसांच्या पथकासह सोनई, शिंगणापूर, बर्‍हाणपूर येथील गोमाता स्वयंसेवकांनी वैभवदत्त लॉन्स शिंगवे तुकाई शिवारात अहमदनगरकडून संभाजीनगरकडे जात असलेल्या पांढर्‍या रंगाच्या व पिवळेपट्टे असलेला टाटा कंपनीचा 1109 (एमएच 05 एएम 2035) टेम्पो थांबवला. अंधाराचा फायदा घेत वाहन चालक पसार झाला पण त्याचा साथीदार साहिल जलील शेख ता. नगर याला पोलिसांनी व स्वयंसेवकांनी पकडले.

सदर वाहनाची ताडपत्री बाजूला करून पाहिले असता त्यात गोवंशीय जनावरे अवैधरित्या कत्तल करून मांस विक्री करण्याच्या उद्देशाने असुरक्षितपणे हालचाल करता येणार नाही अशा रीतीने आखूड दोरखंडाने 13 काळ्या रंगाच्या गोलशिंगे असलेल्या म्हशींना पुरेसा अन्न, पाणी, निवारा याची सोय न करता क्रुरतेने बांधून ठेवलेल्या दिसल्या. या म्हशी कुठे चालवल्या याची विचारपूस केली असता संभाजीनगरला कत्तलीसाठी चालवल्याचे शेख याने सांगितले. 3 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 13 म्हशी व 5 लाख रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण 8 लाख 25 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस कॉन्स्टेबल गोरक्षनाथ भगवान जावळे (वय 32) यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 271/2023 महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारित अधिनियम 1995 चे कलम 5(अ) सह प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास/ छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 भादवी कलम 34 प्रमाणे नितीन पाटोळे व साहिल जलील शेख दोघेही रा. बायजाबाई जेऊर, ता. नगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नानासाहेब तुपे पुढील तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २९ मार्च २०२५ – वल्लीमध्ये जीवन। नाना फळीफुली जीवन।

0
वसुंधरेच्या जीवसृष्टीतील झाडांचे महत्त्व सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मानवी मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. झाडे तोडणे मानवी हत्येपेक्षाही गंभीर आहे अशी टिप्पणी केली आहे....