Saturday, October 10, 2026
Homeक्राईमShrirampur : कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक; चौघांवर गुन्हा

Shrirampur : कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक; चौघांवर गुन्हा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कत्तलीसाठी गोवंशीय जनावराची वाहतूक केली जात असल्याच्या संशयावरून बेलापूर पोलिसांनी एकलहरे शिवारातील जवाहरवाडी परिसरात टेम्पो पकडला. या कारवाईत देशी गोर्‍हा व टेम्पो ताब्यात घेण्यात आला असून, रांजणखोल व श्रीरामपूर येथील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, एकलहरे शिवारात गोवंशीय जातीचे वासरू टेम्पोमधून नेले जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या गोरक्षकांना मिळाली. वासराला वाहनात घट्ट बांधून नेले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बेलापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल संपतराव बडे, बी. आर. कोळपे, जालिंदर माने व आकाश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

पोलिसांनी टेम्पोचालकाकडे गोवंशीय जनावराच्या खरेदी-विक्रीची पावती तसेच वाहतुकीचा परवाना याबाबत विचारणा केली. मात्र, संबंधितांकडे कोणतीही पावती किंवा परवाना नसल्याचे समोर आले. समाधानकारक माहिती न मिळाल्याने पोलिसांनी अशोक लेलँड कंपनीचा तीन लाख रुपये किमतीचा टेम्पो आणि अंदाजे दहा हजार रुपये किमतीचा देशी गोर्‍हा ताब्यात घेतला. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संपतराव बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाहनचालक वसीम पांडे, अब्दुलसलाम पांडे तसेच सोहेल सय्यद व अरबाज सय्यद यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Abhijeet Dipke : मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजीचे...

0
मुंबई | Mumbai कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (दि.१० ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार...