Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : तीन कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे; 3.77 लाखांचा मुद्देमाल जप्त

Crime News : तीन कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे; 3.77 लाखांचा मुद्देमाल जप्त

6 जणांविरूध्द गुन्हे

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन ठिकाणी छापे टाकून 6 संशयित आरोपींविरूध्द 3 गुन्हे दाखल केले असून, सुमारे 3 लाख 77 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. या पथकांनी भिंगार कॅम्प, तोफखाना आणि कर्जत पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई केली. तन्वीर मोहम्मद कुरेशी (31), सलीम इक्बाल कुरेशी (18, दोघेही रा. सदरबाजार, भिंगार) यांच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात, तन्वीर सत्तार कुरेशी (40, रा. सुभेदार गल्ली, अहिल्यानगर), इम्रान हनीफ कुरेशी (40, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात, इरफान उर्फ बबलु कुरेशी (रा. कुरेशी गल्ली, राशीन, ता. कर्जत) व सचिन आढाव (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरूध्द कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

YouTube video player

ही संयुक्त कारवाई उपनिरीक्षक अनंत सालगुडे, अंमलदार बिरप्पा करमल, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, अशोक लिपणे, बाळासाहेब गुंजाळ, हृदय घोडके, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, भगवान थोरात आणि रोहित येमुल यांच्या प्रयत्नातून करण्यात आली.

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...