अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील सबजेल चौक परिसरात राहणार्या एका महिलेचा मृत्यू झोपेच्या गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने झाला असल्याचे समोर आले आहे. भावना सतीश उपलांची (वय 38) असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदरची घटना बुधवारी (16 एप्रिल) घडली.
- Advertisement -
भावना उपलांची यांनी झोपेच्या गोळ्यांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याचे त्यांच्या नातेवाईकांच्या लक्ष्यात येताच त्यांनी उपचारासाठी भावना यांना अहिल्यानगर शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा रात्री मृत्यू झाला. यासंदर्भात संबंधित खासगी रुग्णालयातून मिळालेल्या डेथ मेमोच्या आधारे कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार आनंद दाणी अधिक तपास करीत आहेत.