Wednesday, May 29, 2024
Homeमुख्य बातम्याव्हॉट्‌सॲपवरून करा लसीचा स्लॉट बुक

व्हॉट्‌सॲपवरून करा लसीचा स्लॉट बुक

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

व्हॉट्‌सॲपने (WhatsApp) एक नवीन फीचर आणले आहे. या माध्यमातून करोना प्रतिबंधात्मक लसीचे (Corona Vaccine) स्लॉट बुक (Slot book) करता येणार आहे….

- Advertisement -

हे स्लॉट बुक करताना तुम्हाला तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राची (Corona Vaccination Center) माहितीदेखील मिळणार आहे.

व्हॉट्‌सॲपचे नवीन फिचर MyGov Corona helpdesk सोबत काम करणार आहे. याआधी व्हॉट्‌सॲपवर लसीकरणाचे प्रमाणपत्र (Certificate) डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली होती.

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा लसीचे प्रमाणपत्र; ‘असे’ करा डाउनलोड

स्लॉट बुक करण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये हेल्प डेस्क चॅट बॉट नंबर ९१-९०१३१५१५१५ सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्‌सॲपमध्ये MyGov Corona helpdesk चा संपर्क उघडा. आता बुक स्लॉट लिहून मेसेज करा.

यानंतर तुमच्या मोबाइल क्रमांकावर सहा अंकी ओटीपी (OTP) येईल. तुम्हाला लसीकरण केंद्राचे स्थान, तारीख आणि नाव निवडण्याचा पर्याय देण्यात येईल. तुमच्या पिनकोडनुसार जवळच्या लसीकरण केंद्रावर स्लॉट बुक केला जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या