Saturday, May 4, 2024
Homeधुळेएसटीने प्रवास करतांना डिसेंबरपासून स्मार्टकार्ड बंधनकारक

एसटीने प्रवास करतांना डिसेंबरपासून स्मार्टकार्ड बंधनकारक

धर्मेंद्र जगताप,धुळे – Dhule :

परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करण्यासाठी 1 डिसेंबरपासून ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापकांनी निर्देश दिले आहेत.

- Advertisement -

एसटीने प्रवास करण्यासाठी ज्येष्ठ नागरिक व इतर सवलतधारकांना स्मार्टकार्ड देण्यात येते. स्मार्टकार्डसाठी 14 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

परंतू करोनाचा संसर्ग वाढल्यामुळे शासनाकडून गर्दी कमी करावी असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे अनेक प्रवाशांना आगारात येवून स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने या योजनेला 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

नवीन स्मार्टकार्ड प्राप्त होईपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना प्रवासासाठी सध्याचे प्रचलित असलेले ओळखपत्र ग्राह्य धरण्यास परवानगी देण्यात आली आहे.

परंतू 1 डिसेंबरनंतर नवीन स्मार्टकार्ड बंधनकारक करण्यात आले आहे. 1 डिसेंबरनंतर जुन्या कार्डने प्रवास करता येणार नाही.याबाबत राज्यमार्ग परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी विभाग नियंत्रकांना निर्देश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या