Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याआधुनिक यंत्रणांद्वारे होणार स्मार्ट शहर सुरक्षा

आधुनिक यंत्रणांद्वारे होणार स्मार्ट शहर सुरक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महानगरपालिका परिसरातील आधुनिक सेवा सुविधांमध्ये विकास करण्याच्या उद्देशाने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून ‘नाशिक स्मार्ट व सेफ सिटी सोल्युशन’ प्रकल्प वेगाने साकारला जात आहे. या माध्यमातून नाशिक महानगरपालिका व पोलिसांना आपल्या दैनंदिन कामकाजात सुलभता आणण्यासाठी विविध सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

- Advertisement -

स्मार्ट सिटी नाशिक, राज्याचे गृह मंत्रालय व माहिती व तंत्रज्ञान संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाची उभारणी केली जात आहे. त्यातील प्रामुख्याने अ‍ॅडेप्टिव्ह ट्राफीक कंन्ट्रोल सिस्टीम, फ्लड सेंटर, कॉल बॉक्स, वायफाय एक्सेस, स्मार्ट बीन्स सेंटर, पब्लिक ऍड्रेस सिस्टीम, सिंगल कमांड कंट्रोल रूम यासारख्या विविध सुविधांची उभारणी अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

या प्रकल्पासाठी सुमारे 167 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा खर्च स्मार्टसिटी (100 कोटी), गृह मंत्रालय व माहिती व तंत्रज्ञान विभागांच्या माध्यमातून उर्वरित 67 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. शहराच्या सुरक्षिततेसोबतच त्यांची गुणवत्ता विकास व व विविध घडामोडींची नोंद घेण्याचा प्रयत्न यात आहे. शहरात यासाठी विविध ठिकाणचे 800 कॅमेरे लावण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

शहरातील विविध 26 ठिकाणी पर्यावरण सेन्सर उभारले जाणार आहेत.त्या माध्यमातून हवेतील सल्फर डाय ऑक्साईड,ऑक्सिजन, ओझोन,सूक्ष्मजीविकांच्या सूक्ष्म बदलाची नोंद ठेवणारी अ‍ॅक्वा एअर क्वालिटी इंडेक्स यंत्रणा उभारण्यात येणार आहे.

सेन्सर सिस्टिम

गोदावरी नदीवर असलेल्या पूलांसह विविध ठिकाणांवर पूर संदेश देणार्‍या यंत्रणाचे सेंसर लावण्यात येणार आहे. त्याच्या माध्यमातून नदीच्या पाण्याच्या पातळीत होणार्‍या बदलांची नोंद घेतली जाणार आहे.

पेलिकन सिग्नल यंत्रणा

दहा शाळा रुग्णालय व गर्दीच्या ठिकाणांवर ज्येष्ठ नागरिक, लहान मुले ,महिलांसाठी रस्ता ओलांडणे सोपे जावे याकरिता दहा ठिकाणी पेलिकन सिग्नल यंत्रणेच्या माध्यमातून रस्ता ओलांडताना वाहतुकीला थोपवणे शक्य होणार आहे.

इंटिग्रेटेड कमांड कंन्ट्रोल सेंटर

या सर्व आधुनिक यंत्रणांचे संयुक्त केंद्र म्हणजेच इंटिग्रेटेड कमांड सेंटर मनपासाठी पंचवटी विभागिय कार्यालयात तर पोलिसांसाठी मुख्यालयात उभारले जात आहे. याठिकाणी पोलीस यंत्रणेसाठी 20 व मनपासाठी 20 संगणकांद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे त्यासोबतच दोन्ही ठिकाणी 2 बाय 4 च्या 8 व्हिडिओ वॉलच्या माध्यमातून सर्वच ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी करता येणार आहे.

‘ऍडेप्टिव्ह ट्राफिक कंट्रोल सिस्टीम’

शहरातील विविध 40 सिग्नल जंक्शन वर ‘ऍडेप्टिव्ह ट्राफिक कंट्रोल सिस्टीम’ उभारली जाणार असून, या माध्यमातून विविध सिंग्नल वर वाहतूक नसतानाही राहत असल्याने हिरव्या सिग्नलमुळे इतरांचा खोळंबा होतो. त्यामुळे वाहनाची गर्दी व स्थितीवरून सिंगल यंत्रणा कार्यरत ठेवली जाणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यांचा वेळही वाचणार आहे

हायस्पीडड वायफाय एक्सेस

शहरात 50 गर्दीच्या ठिकाणांवर वायफाय एक्सेस पॉईंट उभारले जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने मनपाचे सर्व विभागीय कार्यालय, उद्याने, मंदिर, बस स्थानके या ठिकाणी या यंत्रणा उभारण्यात येणार आहेत. या सिस्टीममध्ये सुरक्षा यंत्रणाही अंतर्भूत राहणार आहे. यासाठी जिओ कंपनीने 2019 साली हाय स्पीड यंत्रणा उभारण्याची निवीदा घेतलेली आहे. जनतेला सूचना देण्याच्या दृष्टीने मनपासाठी व पोलिस यंत्रणेद्वारा जनतेला आवाहन करण्यासाठी सूचना यंत्रणा उभारली जाणार आहे. तेरा ठिकाणी सूचना देण्यासाठी मेसेज डिस्प्ले उभारले जाणार आहेत.या माध्यमातून मनपाच्या विविध सूचना विकास कामे प्रदर्शित केली जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या