Monday, May 27, 2024
Homeमुख्य बातम्यापोलीस ठाण्यांत "सीसीटीव्ही' मुळे कामात सुसूत्रता

पोलीस ठाण्यांत “सीसीटीव्ही’ मुळे कामात सुसूत्रता

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक शहर परिसरातील दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी नवीन लोकवस्ती निर्माण झाले आहेत तर

- Advertisement -

जिल्हासह राज्य बाहेरील लोकांची गर्दी वाढत असल्याने शहर पोलीस दलावर (City Police Force) कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित राखण्याचे मोठे आवाहन आहे. त्यामुळेच नाशिक शहरातील सर्व 14 पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा लावण्यात आली आहे.

त्याचा फायद देखील होत आहे. पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही 24 तास सुरू असल्यामुळे एकीकडे गुन्हेगारांवर वचक निर्माण होत असून दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची (Senior Police Officers) नजर देखील पोलीस सेवकांवर असते. त्यामुळे कामात पारदर्शकता येत आहे.

नाशिक शहराचा मागील दोन दशकांमध्ये झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे पूर्वी मोजक्या पोलीस ठाण्यांवर शहरातील कायदा व सुव्यवस्था (Law and order) अबाधित ठेवण्याची जबाबदारी होती, मात्र जसे जसे शहराची हद्द वाढत गेली व लोकसंख्या वाढत गेली त्या दृष्टीने शहरातील पोलीस ठाण्याचा देखील विस्तार होत गेला. आता पुन्हा काही दिवसांनी चुंचाळे हा नवीन पोलीस ठाणे देखील कार्यरत होणार आहे.

सध्या भद्रकाली पोलीस ठाणे, आडगाव पोलीस ठाणे, म्हसरुळ पोलीस ठाणे, पंचवटी पोलीस ठाणे, मुंबईनाका पोलीस ठाणे, सरकारवाडा पोलीस ठाणे, गंगापूर पोलीस ठाणे, सातपूर पोलीस ठाणे, अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, देवळाली कॅम्प पोलीस ठाणे, नाशिकरोड पोलीस ठाणे उपनगर पोलीस ठाणे व सायबर पोलिस ठाणे असे १४ पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित आहे.

त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिस दलाच्या (Rural Police Force) जिल्हाभरातील ४० पोलिस ठाण्यांपैकी बहुतांश पोलिस ठाण्यांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV cameras) बसविण्यात आले आहे. पोलिस ठाण्यात तक्रार द्यायला गेल्यानंतर बहुसंख्य लोकांना पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या अडवणुकीला सामोरे जावे लागल्याचे अनुभव येत असल्याचे चित्रपटांच्या माध्यमातून दिसले आहे.

तक्रार नोंदवून न घेणे, तक्रार नोंदवून घेण्यासाठी बराच वेळ थांबवून ठेवणे, असे प्रकारचे घडल्याने पोलीस ठाणे (Police Station) आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. पोलिसांवर कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासोबत मानवाधिकारांचे हनन होणार नाही, याची खबरदारी घेण्याचीही जबाबदारी आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या तक्रारदारांप्रती पोलिसही संवेदनशील झाले असून त्यामुळे नागरिकांमध्ये न्याय भावना वाढली आहे.

शहरातील अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या भद्रकाली पोलीस ठाणे परिसरात एकूण 15 कॅमेरे लावण्यात आले आहे तर यातील काही कॅमेरे अत्यंत आधुनिक पद्धतीचे असल्यामुळे सुमारे अर्धा किलोमीटर पर्यंतचा एरिया हा कॅमेरा कव्हर करतो.

– दत्ता पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे

सीसीटीव्ही कॅमेरामुळे प्रशासनिक कामांमध्ये मदत होते. पोलीस ठाणे आवारात कोण येतो, कोण जातो याच्याकडे बारीक लक्ष असते. तक्रारदार पोलीस स्टेशनला कधी आले व कधी तक्रार दिली होती याची माहिती काढायची राहिली तर सीसीटीव्हीची मदत मिळते.

– साजन सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरकारवाडा पोलीस ठाणे

- Advertisment -

ताज्या बातम्या