Monday, November 25, 2024
Homeधुळेशिरपुरात 84 लाखांच्या गुटख्याची तस्करी रोखली

शिरपुरात 84 लाखांच्या गुटख्याची तस्करी रोखली

धुळे । Dhule

शिरपूर तालुका पोलिसांनी इंदूरहुन धुळ्यात होणारी गुटखा, तंबाखूची होणारी तस्करी नाकाबंदी करीत दहिवद व हाडाखेड शिवारातच रोखली. दोन ट्रकसह एकूण 83 लाखांची तंबाखू जप्त करण्यात आली. मध्यरात्री आणि पहाटेच्या सुमारास या कारवाई करण्यात आल्या.

- Advertisement -

ट्रकमधून (क्र. के ए 01 ए जे 0015) महाराष्ट्र राज्यात प्रतिंबधीत असणारी सुगंधीत तंबाखू इंदूरकडून धुळयाकडे नेली जात असल्याची गोपनीय माहिती सपोनि सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकासह मुबई-आग्रा महामार्गावरील दहिवद गावजवळील छत्रपती हॉटेल समोर नाकाबंदी केली. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास संशयीत ट्रक येताना दिसले. त्या ट्रकला पोलीसांनी हात देवून थांबवले. चालकास वाहनामधील मालाबाबत विचारले असता तो समाधान कारक उत्तर देत नसल्याने वाहन पोलीस ठाणे

आवारात आणण्यात आले. तसेच त्यांनतर पुन्हा गुप्त माहितीवरून दुसर्‍या एका ट्रकला (क्र.के ए01 ए जे 2776) हाडाखेड सिमा तपासणी नाका येथे नाकाबंदी करुन पहाटे चार वाजता पकडण्यात आले. या ट्रकवरील चालक देखील समाधान कारक उत्तर देत नसलयाने वाहन पोलीस ठाणे आवारात आणण्यात आले. दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यात तंबाखूचा माल आढळून आला. के ए01- ए जे 0015 ट्रकवरील चालक किशोर राव एन नागेद्रराव (वय 31 रा. रेल्वे कम्पाऊन्ड मपाडी रोड बँगलोर नॉर्थ, कर्नाटक) यास ताब्यात घेत

या ट्रकमधून 33 लाख 60 हजार रुपये किंमतीची रत्ना 3000 कंपनीची तंबाखुचे एकूण 280 बॉक्स व 15 हजार लाखाचा ट्रक तसेच दुसर्‍या कारवाईत ट्रक वरील (क्र. के ए01 ए जे 2776) चालक मंजू रोक्कडदम चन्नाप्पा (वय 33 रा. चन्नाप्पा एन ए प्लॉट मदान भावी धारवाड, कर्नाटक) याला ताब्यात घेत या ट्रकमधून 12 लाखाची रत्ना 3000 कंपनीची तंबाखूचे एकूण 100 बॉक्स व 7 लाख 64 हजार 400 रुपये किंमतीची प्रभात 310 कंपनीची तंबाखूचे 65 बॉक्स व 15 लाखाचा ट्रक अशा दोन्ही वाहनानसह एकूण 83 लाख 24 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. धुळे येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालय यांना लेखी पत्र देवून पुढील कायदेशीर कार्यवाई सुरु आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे व प्रभारी उपविभागिय पोलीस अधिकारी अंसाराम आगरकर यांच्या मार्गर्शनाखाली शिरपूर तालूका पोलीस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ, पोसई संदीप पाटील, पोसई कृष्णा पाटील, पोहेकॉ संजय सुर्यवंशी पोना संदीप ठाकरे, पोकॉ रोहीदास संतोष पावरा, मनोज पाटील, संतोष पाटील, इसरार जकाउल्ला फारुकी, कृष्णा पावरा, मुकेश पावरा, योगेश मोरे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या