Saturday, May 25, 2024
Homeधुळेगुटख्याची तस्करी ; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

गुटख्याची तस्करी ; 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

धुळे – प्रतिनिधी dhule

शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी.पथकाने ट्रक मधून तांदूळ व इलेक्ट्रिक वायरच्या आड होणारी गुटख्याची तस्करी रोखली. ३० लाखांचा ट्रक व १० लाख ८३ हजार ३०० रूपये किंमतीची सुगंधीत तंबाखू असा एकुण ४० लाख ८३ हजार ३००रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आगरकर यांना मिळालेला गोपनीय माहितीच्या आधारे दि.१९ रोजी पहाटे अडीच वाजेचे सुमारास ही कारवाई करण्यात आली. इंदूरकडून धुळ्याकडे या गुटख्याची वाहतूक केली जात होती. डी.बी.पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरपूर टोल नाक्याच्या पुढे सापळा लावून इंदोरकडून धुळेकडे जाणाऱ्या मालट्रकला (क्र.आरजे ३२ जिसी ६०७५) शिताफीने पकडले.

- Advertisment -

ताज्या बातम्या