धुळे । प्रतिनिधी dhule
तालुक्यातील सावळदे फाट्यानजीक गुटख्याची वाहतूक मोहाडी पोलिसांनी रोखली असून या ठिकाणाहून 1 लाख 24 हजार 211 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन जणांविरूध्द मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावळदे फाट्यानजीक एमएच 48 एएक्स 3623 क्रमांकाच्या रिक्षातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेल्या राजनिवास गुटखा व विमल पानमसाला, सुगंधीत तंबाखू यांची वाहतूक केली जात होती.
मोहाडी पोलिसांनी रिक्षा पकडून त्या रिक्षातून 6 हजार 336 रूपयांचा राजनिवास पानमसाला, 12 हजार 220 रूपये किंमतीच विमल पानमसाला, जाफरानी जर्दाची पाकीटे 1 हजार 584 रूपयाचे, विमल 900 रूपये किंमतीचे, विमल 1 हजार 452, विमल पानमसाला 3 हजार 651 रूपये व रिक्षा 75 हजार रूपये असा 1 लाख 24 हजार 211 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी रिक्षा चालक अब्दूल मलीक नेहाल अहमद (वय 26 रा. मालेगाव), शाह फैजल शब्बीद अहमद यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.