धुळे – प्रतिनिधी dhule
पुणे पासिंगच्या कारमधून होणारी अफूची तस्करी उघडकिस आली आहे. तालुक्यातील मोघण शिवारातून मोहाडी पोलिसांनी कार व 138 किलो अफुची बोंडे असा 17 लाखांचा मु्देमाल जप्त केला.
दरम्यान पोलिसही या कारच्या माघार होते. त्यामुळे चालकाने ही कार आडमार्गाने टाकत बेवारस स्थितीत सोडून दिली. पहाटे अडीच वाजता ही कार मिळून आली. याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्वी ते शिरूड चौफुली रस्त्यावरील मोघण गाव शिवारात पाटचारी जवळ रस्त्यापासून सुमारे पाचशे मिटर अंतरावर रामदास देवचंद माळी यांच्या शेताजवळ वहीवाट रस्त्यावर एमएच 12 यु एफ क्रमांकाचे हे वाहन मिळून आले.
मोहाडी पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात अफु सदृष्य पिकाची बोंडू आढळून आली. एकुण 6 लाख 92 हजार 450 रूपये किंमतीची 138 किलो अफुची बोंडे व 10 लाखांची कार असा एकुण 16 लाख 92 हजार 450 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अफू सदृष्य पिकाची बोंडे असलेल्या मानवी मेंदूवर परिणार घडवून आणणार्या या मादक पदार्थाची विक्री करण्यांच्या उद्देशाने घेवून जात असतांना ही कार बेवारस स्थितीत मिळून आली.
याप्रकरणी असंई बापू दाभाडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 18 (ब), 22 (ब) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, मोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते व उपनिरीक्षक हेमंत राऊत यांनी भेट देत पाहणी केली.