मुंबई । Mumbai
कोकणातील ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही. ही गळती थांबवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून कोणतीही पावले उचलण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढलेल्या स्नेहल जगताप अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत पोकळी निर्माण झाली आहे, तर मंत्री भरत गोगावले यांची डोकेदुखी वाढली आहे.
मूळच्या काँग्रेसमध्ये असलेल्या स्नेहल जगताप यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. जगताप यांनी भरत गोगागले यांच्याविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, स्नेहल जगताप यांचा 26 हजार मतांनी पराभव झाला होता.
जगताप ह्या भाजपात प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. पण, अलीकडेच जगताप यांनी कुटुंबासोबत खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेतली होती. तेव्हाच जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे संकेत मिळाले होते.