Wednesday, September 11, 2024
Homeनगरस्नेहलता कोल्हे यांच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाचा सर्वांगीन विकास

स्नेहलता कोल्हे यांच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाचा सर्वांगीन विकास

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

स्नेहलता कोल्हे यांनी आमदार असताना कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला पाणी, वीज, रस्ते, पाटपाणी, शिक्षण, आरोग्य, सिंचन आदी सुविधा उपलब्ध करून देत कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली. कष्टकरी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेचे विविध प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून दिला. स्नेहलताताई कोल्हे यांच्या आमदारकीच्या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा खर्‍या अर्थाने विकास झाला, असे प्रतिपादन वाल्मीकराव भोकरे यांनी केले.

- Advertisement -

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या वतीने मोदी 9 जनसंपर्क अभियानांतर्गत कासली (शिरसगाव) येथे रविवारी शिवाजी जाधव यांच्या वस्तीवर भाजप नेत्या स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली टिफिन पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी स्नेहलताताई कोल्हे यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने गेल्या नऊ वर्षांत राबविलेल्या विविध विकास योजनांची माहिती देऊन भाजप कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजना तळागाळातील गरजू लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना या योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसेच पक्ष बळकट करण्यासाठी एकदिलाने काम करावे, असे आवाहन केले.

यावेळी तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी प्रास्ताविकात पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने नऊ वर्षांत केलेल्या विकास कामांची माहिती दिली. यावेळी केशवराव भवर, ज्ञानेश्वर परजणे, प्रकाश शिंदे, सुदाम कर्पे, शिवाजी जाधव, गोविंदराव मलिक, अंबादास पाटोळे, अशोक शिंदे, संजय पठाडे, किसन गव्हाळे, भाऊसाहेब शिरसाट, गणेश भिंगारे, दत्तात्रय मलिक, बाबासाहेब भिंगारे, मनोज तुपे, दत्तात्रय हेगडमल, विष्णू बोळीज, शिवाजी गायकवाड, अंकुश गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, बबन गायकवाड, रवींद्र गायकवाड, रविकांत भवर, रोहित मढवे, ऋषिकेश जाधव, सीताराम गोरे, कैलास जामदार, बाळासाहेब भिंगारे, केशव गायकवाड, ज्ञानदेव गायके, दत्तात्रय पाटोळे, हरिभाऊ गव्हाळे, अशोक पठाडे, सुदाम गायकवाड, बबन साळुंके, नवनाथ मरकड, अरविंद लंके, अभिजित बोडखे, रतन मलिक, हर्षदाताई जाधव, जयश्रीताई मढवे, पुष्पाताई बोजगे, शीतल गायकवाड, ज्योती महाले, वंदना मच्छिंद्र जाधव, वंदना गोकुळ जाधव, निर्मला शिवाजी जाधव आदींसह सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथप्रमुख तसेच कासली, शिरसगाव, संवत्सर, दहेगाव (बोलका), पढेगाव व परिसरातील पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या