Sunday, September 8, 2024
Homeनाशिकआतापर्यंत शहरातील २४ पोलीस करोना पॉझिटिव्ह

आतापर्यंत शहरातील २४ पोलीस करोना पॉझिटिव्ह

नाशिक । Nashik

शहरात करोनाचा उद्रेक झाला असून अद्यापपर्यंत करोनापासून दूर राहिलेल्या शहर पोलिसांना संसर्स सुरु झाला आहे. शहरातील 31 पोलीस करोना संशयित म्हणून दाखल झाले होते. यापैकी 24 पोलीस अधिकारी व सेवक पॉझिटिव्ह आले आहेत. तर इंदिरानगर येथील एक सेवक शहीद झाला आहे. यामुळे ग्रामीण पोलीस दलानंतर आता शहर पोलीसहीकरोनाच्या विळख्यात येतअसल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

शहर पोलीस दलातील 12 करोनाबाधित पोलिसांवर सध्या विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आतापर्यंत 24 जणांना करोनाची लागण झाली असून, एक करोना योद्धा शहीद झाले आहेत. शहर पोलीस दलात ग्रामीण पोलीस दलाच्या तुलनेत करोनाचा संसर्ग कमी असला तरी आतापर्यंत 32 संशयित सापडले आहेत. त्यापैकी 24 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यातील 12 जणांवर सध्या आडगाव येथील मेडीकल कॉलेजसह खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यात संशयित तसेच पॉझिटिव्ह आढळून येण्यात इंदिरानगर आणि क्राईम ब्रँचच्या युनिट ने आघाडी घेतली आहे. येथे अनुक्रमे सात आणि सहा व्यक्ती संशयित वा पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. यापाठोपाठ, पंचवटी, भद्रकाली, देवळाली कॅम्प, उपनगर, नाशिकरोड, वाहतूक शाखा, मुंबईनाका, मुख्यालय आदी ठिकाणी एक-दोन संशयित तसेच पॉझिटिव्ह पोलीस सेवक आढळून आलेत.

शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याने कायदा सुव्यवस्थेसाठी पोलिसांनी कायम कार्यरत रहावे लागत आहे. समन्स तसेच वॉरंट बजावण्याचे कर्तव्य पोलिसांना पार पाडावे लागले. त्यातून करोनाचा संसर्ग थोडाफार वाढला. मात्र, आजही इतर शहराच्या तुलनेत शहर पोलीस दलात करोना संसर्गाचे

प्रमाण फारच कमी आहे. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सुरुवातीपासूनच यासाठी पुढाकार घेतला. औषधांसह, गरम पाण्याची सुविधा, गोकी घड्याळ, पुरेशी विश्रांतीची काळजी अशा अनेक घटकांवर काम करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शहरात करोनाचा प्रसार वाढला असला तरी पोलिसांचे काम थांबलेले नाही. गुन्हेगारांना पकडणे असो की वाहतूक नियोजन, कोर्ट, तपास आदी कामे होत आहे. यात पोलिसांचा सर्वच स्थरातील नागरिकांशी संबंध येतो. इंदिरानगर पोलिसांना वडाळा व त्याला लागून असलेला भाग हॉटस्पॉट होता.यामुळे या पोलीस ठाण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत. परंतु इतरांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. सेवकांना करोना मुक्त ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाचे पूर्ण प्रयत्न आहेत.

– पौर्णिमा चौगुले, पोलीस उपायुक्त

अशी आकडेवारी

एकूण दाखल ३१

पॉझिटिव्ह २४

करोनामुक्त १८

उपचार सुरू असलेले १२

मृत्यू १

निगेटिव्ह ७

- Advertisment -

ताज्या बातम्या