मुंबई | Mumbai
पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात एकही बातमी छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला घेऊन जा, त्यांना चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला असं म्हणत त्यांना धाब्यावरही घेऊन जा, असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांच्या दिला आहे. याबाबतची ऑडीओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर विरोधाकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. घडलेल्या या संपूर्ण प्रकारानंतर बावनकुळे यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (२५ सप्टेंबर) प्रसारमाध्यमांशी बोलताना या व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत स्पष्टीकरण दिलं. बावनकुळे म्हणाले, मी ते असंच बोललो. मी त्यांना बोललो की बाबा रे, आपण एवढं चांगलं काम करतो. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात एवढं चांगलं काम केलं आहे. तरी आपल्याबद्दल नकारात्मक बातम्या येतात. त्यामुळे पत्रकारांबरोबर बसा, त्यांचा सन्मान करा. त्यांना चहा प्यायला घेऊन जा, तुम्ही त्यांना चहासाठी बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांना खरी वस्तूस्थिती सांगा. शेवटी पत्रकार हे आपल्या व्यवस्थेचा चौथा संभ आहेत. त्यांना सन्मान देऊन त्यांच्याबरोबर चांगलं वागा. या पद्धतीचा सल्ला मी पदाधिकाऱ्यांना दिला. याच्यात काही वाईट नव्हतं.
काय म्हणाले होते बावनकुळे?
बावनकुळे यावेळी म्हणाले की, ज्या बुथवर तुम्ही काम कराल तेथे इलेक्ट्रॉनिक्स मीडियावाले कोण आहेत, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असं काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन, पोर्टलवाले कोण आहेत हे पाहावे. आपण एवढे चांगले काम करतोय, पण हे असे काही टाकतात की, जणू गावात बॉम्बच फुटलाय. यासाठी बुथवर जे चार, पाच पत्रकार आहेत त्यांची यादी तयार करा. यात एक, दोन पोर्टलवाले, प्रिंट आणि इलेक्टॉनिकवाले असतील, त्यांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा, चहा प्यायला बोलवायचे म्हणजे समजलेच असेल तुम्हाला. त्यात काही कमी जास्त झाले तर सुजय विखे आहेतच असं त्यांनी म्हटलं.