Friday, September 20, 2024
Homeब्रेकिंग न्यूजजर ईव्हीएम हॅक होते, मग तुमचा विजय झाला ती ईव्हीएम चांगली का?...

जर ईव्हीएम हॅक होते, मग तुमचा विजय झाला ती ईव्हीएम चांगली का? – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई | प्रतिनिधी Mubai

- Advertisement -

शिवसेना पक्षाच्या 58 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाकडून वरळी डोम येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं . या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर घणाघात केला.

लोकसभा निवडणुकीत आपण ठासून विजय मिळवला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. मग आता तुमचं हिंदुत्व कुठं गेलं?असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला आणि ठाकरे गटाला मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरुन निशाणा साधला.

विशेष म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघ हा आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. पण या मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराला केवळ साडेसहा हजारांचं लीड मिळालं. त्यामुळे आता आदित्य ठाकरे भेंडीबाजारातून लढणार का? अशी खोचक टीका एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता केली.

या वेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की बाळासाहेबांचा विरोध होता तो वोट बँकेच्या घाणेरड्या राजकारणाराला. याकूब मेमनचे कार्यकर्ते तुमच्या ऑफिसमध्ये फिरत होते. मतांसाठी तुम्ही कसाबला डोक्यावर घेतलं. करकरे, कामटे हे शहीद झाले की नाही यावर शंका उपस्थित करता. ओंबळेंनी कसाबला एके ४७ सकट पकडलं. गोळ्या पोटात घेतल्या पण कसाबला सोडलं नाही, त्यांच्यावर तुम्ही प्रश्नचिन्ह व्यक्त करत आहात. मते मिळवण्यासाठी कुठून फतवे निघाले सर्वांना माहीत आहे.

ईव्हीएमचा घोटाळा केला असता तर यामिनी जाधव आणि राहुल शेवाळेही जिंकले असते. वायकरांचा विजय हा जनतेचा विजय आहे. मेरिटवर झालेला विजय आहे.वायकरांच्या ठिकाणी जर ईव्हीएम हॅक होते, मग तुमचा विजय झाला ती ईव्हीएम चांगली का?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या