Sunday, May 18, 2025
Homeधुळेतर कर्जदारांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज

तर कर्जदारांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज

शिरपूर Shirpur । प्रतिनिधी

- Advertisement -

जिल्हा बँकेमार्फत (District Bank) कर्जदार, सभासद, ठेवीदारांना एकूण 89 हजार केसीसी व रूपे डेबिट कार्डचे (KCC and Rupe Debit Card) वाटप करण्यात आले आहे. बँकेने विविध प्रकारच्या योजना (Different types of plans) राबविल्या असून बँकेमार्फत डिजिटल सुविधा (Digital facilities) पुरविण्यात येत आहेत. कर्जदार सभासदांनी 31 मार्चपूर्वी खरीप कर्जाचा (Payment of Kharif Loans) भरणा केल्यास 3 लाख रुपये कर्जापर्यंत शून्य टक्के व्याजदराने (Loan at zero percent interest rate) कर्ज देण्यात येते, अशी माहिती यावेळी बँकेचे सीईओ धीरज चौधरी (CEO Dheeraj Chaudhary) यांनी दिली.

धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरपूर शहरातील चौधरी गल्ली जवळील इमारतीत पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर स्थलांतर करून नवीन फर्निचर व स्ट्राँग रूम सह नूतनीकरण व अद्ययावत करण्यात आलेल्या शाखेचे उद्घाटन बँकेचे ज्येष्ठ संचालक प्रभाकरराव चव्हाण यांच्या हस्ते तसेच लॉकर रूमचे उदघाटन बँकेच्या संचालिका सौ. सीमाताई तुषार रंधे यांच्या हस्ते करण्यात आले. बँकेबद्दल माहिती देतांना सीईओ धीरज चौधरी म्हणाले, बँकेने सन 2022-23 वर्षात 329 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून दिलेल्या लक्षांकापेक्षा 45 टक्के जास्तीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. 31 मार्च 2023 पर्यंत कर्जदारांनी पूर्ण रकमेची कर्जफेड केल्यास 5 एप्रिल 2023 च्या नवीन वाढीव पीक कर्ज वाटपाचे नियोजन आहे. बँकेच्या मार्च 2021 अखेर एकूण ठेवी 607 कोटी रुपये होत्या, मार्च 2022 अखेर एकूण ठेवी 632 कोटी रुपये आहेत. वर्षभरात 25 कोटीने ठेवीत वाढ झाली आहे. बँकेने 57 हजार 500 शेतकर्‍यांना केसीसी मार्फत कर्ज पुरवठा केला असून 31 हजार 500 बचत खातेदारांना रुपये डेबिट कार्डचे वाटप केले आहे. बँकेला मागील चार वर्षात राष्ट्रीय व राज्यस्तरीय राज्यस्तरीय एकूण सात पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 15 ऑक्टोबर रोजी इंदोर येथे राष्ट्रीय स्तरावरील बँकेच्या सर्वांगीण प्रगती बाबतचा पुरस्कार मिळणार आहे. बँकेला 2021-22 आर्थिक वर्षात एकूण 5 कोटी 64 लाख 9 हजार रुपये नफा झाला आहे. बँकेचे सन 2021-22 वर्षात नक्त मूल्यात 10 कोटी 45 लाख रुपयांनी वाढ होऊन मार्च 2022 अखेर 47 कोटी 80 लाख रुपये आहे. बँकेला सतत सहा वर्षांपासून ब ऑडिट वर्ग मिळाला आहे. बँकेचे स्वतःचे 16 एटीएम सेंटर कार्यरत असून चालू वर्षात चार ते पाच नवीन एटीएम सेंटर सुरू करण्याचे बँकेचे नियोजन आहे. नाबार्डच्या एफ आय एफ निधीतून प्राप्त झालेले बँकेचे दोन एटीएम व्हॅन मार्फत धुळे व नंदुरबार दोन्ही जिल्ह्याच्या ग्रामीण भागात व पाड्यांवर सेवा दिली जाते. बँकेच्या सर्व शाखांमध्ये मायक्रो एटीएम सुविधा दिली जात आहे. बचत गटांना 6 लाख रुपये पर्यंत कर्जपुरवठा केला जात आहे. छोटे व्यवसायिकांसाठी जेएलजी साठी कर्ज पुरवठा केला जातो. सर्व शाखा मार्फत संगणकीय कार्यवाही असून डिजिटल साईन, ऑनलाईन सातबारा उतारे देण्याची सुविधा आहे. बँकेने या वर्षात सीटीएस क्लिअरिंग सुविधा 33 शाखांमार्फत सुरू करण्यात आली असून यापुढे 10 शाखांमार्फत सुरू करण्याचे नियोजन आहे. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धीरज चौधरी, माजी संचालिका संगीता मोरे, जि.प. सदस्य भिमराव कोळी, माजी पं.स सदस्य गुलाब कोळी, शिरपूर तालुका सरपंच युनियन अध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, खरेदी विक्री संघ संचालक रवींद्र पाटील, विकास सोसायटी चेअरमन नरेंद्र पाटील, भरत राजपूत, तालुक्यातील अनेक विकास संस्थेचे चेअरमन, सचिव, बँकेचे सरव्यवस्थापक जी.एन.पाटील, व्यवस्थापक ए.एम.सिसोदे, पी.बी.वाघ, शिरपूर विभागाचे अधिकारी बी.एस.बागल, तालुक्यातील शाखाधिकारी, तपासणीस व कर्मचारी उपस्थित होते. आभार रमेश बोरसे यांनी मानले.

जिल्हा बँकेला सहकार्य करावे

बँकेचे शेअर्समध्ये वाढ होण्यासाठी विविध संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सचिव यांनी जिल्हा बँकेला सहकार्य करावे. बँकेच्या ठेवी ठेवण्यासाठी सर्व संस्था, सभासद, ठेवीदार, पतसंस्था व नागरी बँका तसेच शिक्षण संस्था यांनी ठेवी ठेवण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आ. राजवर्धन कदमबांडे, उपाध्यक्ष दीपक पाटील, ज्येष्ठ संचालक प्रभाकरराव चव्हाण, संचालिका सौ.सीमाताई रंधे, सर्व संचालक मंडळ, बँकेचे सीईओ धीरज चौधरी यांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पावसाची आकडेवारी चार दिवसांपासून गायब

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात भाग बदलत अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. अनेक तालुक्यात वादळासोबत जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. मात्र, कोणत्या तालुक्यात...