Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रGaneshotsav 2023 : कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; यंदा गणपतीत एसटीच्या 'इतक्या' जादा...

Ganeshotsav 2023 : कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; यंदा गणपतीत एसटीच्या ‘इतक्या’ जादा बसेस धावणार

मुंबई | Mumbai

गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असून गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ (ST Corporation) सज्ज झाले आहे. कोकणातील (Kokan) चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा १४ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर दरम्यान ३१०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे….

- Advertisement -

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा, कोकणचा चाकरमानी अन् एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ३१०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर (Road) धावणार आहेत.

Aaditya Thackeray : “येत्या दोन-तीन दिवसांत…”; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान

त्यापैकी आज १७०० बसेसचे गट आरक्षण पूर्ण झाले आहे. गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. १४ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

सदर बसेस आरक्षणासाठी https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या Msrtc Mobile Reservation App ॲपव्दारे, तसेच खाजगी बुकींग एजंट व त्यांचे ॲपवर उपलब्ध होणार आहे.

Uddhav Thackeray : “इंडिया आघाडीचे नेतृत्व पक्षप्रमुखांनी नव्हे तर…”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले मत

दरम्यान, गणेशोत्सवावेळी एसटीची वाहतूक (Transportation) सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बस थांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना (Passengers) नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Landslide : शिवभक्तांवर काळाचा घाला; मंदिरावर दरड कोसळून ९ भाविकांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

- Advertisment -

ताज्या बातम्या