Wednesday, May 29, 2024
Homeनाशिकखरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी 'इतके' उमेदवार रिंगणात

खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी ‘इतके’ उमेदवार रिंगणात

सिन्नर। प्रतिनिधी Sinnar

सिन्नर खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीसाठी माघारीच्या शेवटच्या दिवशी 55 इच्छकांनी माघार घेतल्याने संचालक मंडळाच्या 15 जागांसाठी 30 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. रविवारी (दि. 12) मार्च रोजी मतदान होत असून आमदार माणिकराव कोकाटे विरुध्द माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे गट समोरासमोर आहेत.

- Advertisement -

सोसायटी गटाच्या 7 जागांसाठी 14 उमेदवार, कृषी निगडीत संस्थांच्या 1 जागेसाठी 2, व्यक्तीगट गटातून 2 जागेसाठी 4, महिला राखीव गटातून 2 जागांसाठी 4, अनुसूचित जाती जमाती 1 जागेसाठी 2, इतर मागास वर्गीयच्या 1 जागेसाठी 2, भटक्या विमुक्त गटातून 1 जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. 15 जागेसाठी 30 उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. उद्या (दि.3) उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. सिन्नर तालुक्यात सोसायटी गटातून 97, कृषी निगडीत संस्था गटातून 18 तर वैयक्तीक गटात 761 मतदार आहेत. 12 मार्च रोजी मतदान झाल्यानंतर ताबडतोब मतमोजणी होणार आहे.

माणिकराव कोकाटे गट

सोसायटी गटात रामनाथ कर्पे (वावी), युवराज तुपे (बेलू), भागवत चव्हाणके (कीर्तांगळी), संजय गोराणे (शहा), नितीन आव्हाड (वडगाव-सिन्नर), माणिक गडाख (देवपूर), माधव आव्हाड (दोडी) हे उमेदवार उभे आहेत. तर व्यक्तीगत गटात कैलास निरगुडे (पांगरी), अजय सानप (मानोरी), महिला गटात हिराबाई उगले(पाटपिंप्री), शांताबाई कहांडळ (कहांडळवाडी), कृषी निगडीत संस्था गटात अरुण शंकर वाजे (पांढुर्ली), अनुसूचित जाती-जमाती गटात राजेश किसन नवाळे, इतर मागास प्रवर्ग गटात रामदास सहाणे (नळवाडी), भटक्या विमुक्त जाती/जमाती गटात विलास राजाराम लहाने (नायगाव) हे उमेदवार उभे आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

राजाभाऊ वाजे गट

सोसायटी गटात छबू थोरात (पंचाळे), कैलास कातकाडे (केपानगर), ज्ञानेश्वर बोडके (सोनांबे), रामदास दळवी (विंचूरदळवी), अमित पानसरे (ठाणगाव), ताराबाई कोकाटे (खडांगळी), सुखदेव वाजे (पांढुर्ली) हे उमेदवार उभे आहेत. तर व्यक्तीगत गटात विशाल आव्हाड (दापूर), पोपट शिरसाट (मुसळगाव), महिला गटात सुशीला राजेभोसले, नीशा वारुंगसे, कृषी निगडीत संस्था गटात विठ्ठल राजेभोसले (वावी), अनुसूचित जाती जमाती गटात रावसाहेब आढाव (वडगाव-सिन्नर), इतर मागास प्रवर्ग गटात राजेंद्र सहाणे (नळवाडी) तर भटक्या विमुक्त जाती/जमाती गटात लहानू भाबड (दातली) हे उमेदवार रिंगणात आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या