नाशिक | Nashik
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महत्वाचे धरण असणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आज सकाळी गंगापूर धरणातून (Gangapur Dam)२२७२ क्युसेसने विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर सकाळी १० वाजता ११३६ क्युसेसने वाढवून एकूण ३४०८ क्युसेसने सोडण्यात आला होता.
Rohit Pawar : भावी मुख्यमंत्र्याच्या बॅनरच्या चर्चेनंतर रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना केले ‘हे’ आवाहन; म्हणाले…
यानंतर आता पुन्हा एकदा ४ वाजता ११३६ क्युसेसने वाढवून एकूण ४५४४ क्युसेसने पाण्याचा विसर्ग (Cuses Water Discharge) सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून प्रशासनाने पाणी गोदा काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर सध्या गंगापूर धरणात ९७.१० टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध असून धरण समूहात ९४ टक्के पाणी आहे.
Maratha Andolan : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा मैदानात; घेतला ‘हा’ मोठा निर्णय
दरम्यान, एकीकडे मागील दोन दिवसांपासून नाशिकसह (Nashik) जिल्हाभरात पाऊस (Rain) कोसळत असला तरी काही भागांत पावसाने थोडीशी उघडीप दिली होती. मात्र, गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा जलद गतीने वाढला होता. त्यामुळे काल संध्याकाळ पासूनच गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असून यात वाढ करून आज आठ वाजता २७७२ क्युसेस इतका विसर्ग करण्यात आला होता. तसेच सध्या जिल्ह्यातील धरणांची स्थिती पाहिल्यास गतवर्षीच्या तुलनेत अद्यापही १७ टक्के पाणी कमीच आहे. गतवर्षी ९९ टक्के जलसाठा होता, यंदा तो ८२ टक्के इतका आहे.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Ajit Pawar : “माझं ते काम…”; शरद पवार-प्रफुल्ल पटेलांच्या ‘त्या’ फोटोवर अजित पवारांची प्रतिक्रिया